शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तुडतुड्याने तीन एकरातील धानपीक नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:51 IST

शहापूरजवळील नांदोरा येथील रामदास चोपकर यांच्या तीन एकर शेतातील धानपिक तुडतुडा व मावा किडीच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे नष्ट झालेला आहे.

ठळक मुद्देनांदोरा परीसरातील प्रकार : प्रादुर्भाव झालेले पीक कापणी करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कखरबी (नाका) : शहापूरजवळील नांदोरा येथील रामदास चोपकर यांच्या तीन एकर शेतातील धानपिक तुडतुडा व मावा किडीच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे नष्ट झालेला आहे. यावर्षी पावसामुळे अनेक शेतकºयांना वेळेवर रोवणी करता आली नाही. त्यातून मार्ग काढत शेतकºयांनी मिळेल त्या मार्गाने रोवणी करण्याचा प्रयत्न केला. आणि आता हाताशी आलेल्या धानपिकाचे तुडतुड्यामुळे नुकसान होऊन पीक व्यर्थ गेले. एकीकडे तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे वन्यप्राणी शेतपिकांचे नुकसान करीत आहे.नांदोरा परिसरात तुडतुड्याने मोठ्या प्रमाणात धानपीक फस्त केले. त्यामुळे शेतकरी तुडतुड्याच्या भितीने धानाची कापणी करत आहेत. यावेळी कृषी सहायक रेणुका दराडे यांनी शेतकºयांच्या शेतावर जावून सरपंच वनिता पिकलमुंडे, पोलीस पाटील यांच्यासह धानपिकाची पाहणी केली असून तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांची कापणी करावी, असे कृषी सहायक रेणुका दराडे यांनी सांगितले.जीवाचे रान करुन शेतकºयांनी पिकविलेल्या शेतावर नैसर्गिक संकटे वाढत असताना तुडतुड्याच्या आक्रमनाने नांदोरा, परसोडी, खरबी परिसरातील शेतकरी चिंतेत आहे. धान उत्पादक शेतकºयांना अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पावसाच्या अनियमततेमुळे शेतकºयांच्या हाताशी आलेला घास तुडतुडा किडीमुळे हिरावुन घेतला आहे. नांदोरा, परसोडी, खराडी, उमरी परिसरात पावसाअभावी बºयाच शेतकºयांनी धानाची रोवणी केली नाही. काहीनी रोवणी केली तर कापणीच्या तोंडावर तुडतुड्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.