शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची खांबाला धडक विजेच्या तारा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:08 IST

रस्त्यावरून ट्रक फिरविताना मागे असलेल्या विजेच्या खांबाचा चालकाला अंदाज न आल्यामुळे या ट्रकची खांबाला धडक लागली. यात सिमेंटचा खांब तुटून पडला. खांब तुटताच विजेच्या जिवंत तारा रस्त्यावर पडल्या. दरम्यान, आज गणेशपूरचा आठवडी बाजार असल्यामुळे या मार्गावर दररोजपेक्षा वर्दळ अधिक होती. या तारा कुणावर पडल्या असत्या तर मोठी हानी झाली असती.

ठळक मुद्देगणेशपूर येथील प्रकार : तरीही रस्त्यावरून आवागमन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रस्त्यावरून ट्रक फिरविताना मागे असलेल्या विजेच्या खांबाचा चालकाला अंदाज न आल्यामुळे या ट्रकची खांबाला धडक लागली. यात सिमेंटचा खांब तुटून पडला. खांब तुटताच विजेच्या जिवंत तारा रस्त्यावर पडल्या. दरम्यान, आज गणेशपूरचा आठवडी बाजार असल्यामुळे या मार्गावर दररोजपेक्षा वर्दळ अधिक होती. या तारा कुणावर पडल्या असत्या तर मोठी हानी झाली असती.रविवारला सकाळी ११ वाजता सामान भरलेला एक ट्रक गणेशपुरात जात होता. दरम्यान, हा ट्रक फिरविताना चालकाला मागील बाजुला असलेल्या खांबाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रकची मागेहून खांबाला जोरदार धडक लागली. त्यानंतर हा सिमेंटचा हा खांब मधातूनच तुटला आणि जिवंत तारा जमिनीवर पडल्या.दरम्यान, त्या परिसरात जमिनीवर बसलेल्या एका मांस विक्रेत्याच्या दुकानावर या तारा कोसळल्या. त्यावेळी त्या दुकानात ग्राहक नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा सुरू होती.पाच तास वीज ठप्पट्रकची खांबाला धडक लागून वीज तारा जमिनीवर कोसळल्या. त्यानंतरही वीज पुरवठा सुरूच होता. जिवंत तारा रस्त्यावर आणि वाहतूक सुरूच होती. याची माहिती वीज वितरण विभागाला दिल्यानंतर लाईनमन येऊन ट्रान्सफार्मरवरून वीज पुरवठा खंडित केला. दरम्यान, गणेशपूर परिसरात सकाळी ११.३० ते ४.३० पर्यंत पाच तास वीज पुरवठा ठप्प होता.वीज पुरवठा खंडित झाल्यानंतरही तारा रस्त्यावर पडून होत्या. तरीही या मार्गाने वाहतूक सुरूच होती. आवागमन करणाऱ्या लोकांना या तारा दिसत नसल्यामुळे घटना स्थळाच्या बाजुला असलेल्या मेहर बंधूनी रस्त्याने ये-जा करणाºया लोकांना वीज तारा रस्त्यावर पडून असल्याची सूचना देत सतर्क करीत होते. त्यानंतर दुपारी १ वाजतानंतर नवीन खांब लावण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केली.