शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

विजयामुळे आनंदाश्रूने डोळे पाणावले

By admin | Updated: October 19, 2014 23:17 IST

तुमसर विधानसभा मतदार संघात आज मतमोजणीचा आलेला निकाल भविष्यातील राजकीय फेरबदलाचे संकेत म्हणावे. रविवारी सकाळपासून मतमोजणीची प्रचंड उत्कंठा उमेदवारासह मतदारांमध्ये होती.

अनपेक्षित पण प्रचंड मताक्य : भाजपने काढले मागील पराभवाचे ऊट्टेतुमसर : तुमसर विधानसभा मतदार संघात आज मतमोजणीचा आलेला निकाल भविष्यातील राजकीय फेरबदलाचे संकेत म्हणावे. रविवारी सकाळपासून मतमोजणीची प्रचंड उत्कंठा उमेदवारासह मतदारांमध्ये होती. विजयावर शिक्कामोर्तब झाल्यावर नवनियुक्त आमदार चरण वाघमारे यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. या आनंदाश्रूंना त्यांनी वाट मोकळी केली असता उपस्थित कार्यकर्त्यांचेही हृदयाची ढोके मंदावली. भाजपचे उमेदवार चरण वाघमारे यांनी २८ हजार ४४८ मतांची प्रचंड आघाडीसह विजयी संपादन केला. प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळच्या सत्रात सुरूवात होण्यापुर्वी उमेदवार, समर्थकांच्या हृदयाचे ठोके क्षणाक्षणाला वाढत होते. चेहरे हिरमुसलेले, विजयाबद्दल साशंकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. पुढच्या क्षणाला काय होईल, असे धीर गंभीर वातावरण मत मोजणी केंद्रावर दिसत होते. प्रथम फेरी मतमोजणीच्या सुरूवातीची घोषणा मुख्य निरीक्षकांनी केल्यावर ईव्हीएम मशीनचे बीप वाजले. त्यामुळे उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींचे डोळे ईव्हीएम मशीनकडे लागले. मतदान केंद्र क्रमांक एक वर भाजप १६८, शिवसेना ११०, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेस ३३ व बसपा ३५ असे खाते उघडले. भाजप प्रतिनिधींचे डोळे आनंदाने तराळले. त्यांनी एकमेकांकडे हातवारे करून विजयी खूण दाखविली.शिवसेनेने तिसऱ्या, पाचव्या, सहाव्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने दहाव्या फेरीत मताधीक्य घेतल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र या आशा क्षणभंगुर ठरल्या. पुढल्या फेऱ्यांमध्ये भाजपने एक हाती विजयी संपादन केल्याप्रती पुढील सर्व फेऱ्यांमध्ये मताधिक्य घेतले. तेराव्या फेरीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोलतासे व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषाला सुरूवात केली. तुमसर मतदारसंघात पंचरंगी लढतीचे सुरूवातीलाच चित्र दिसत होते. पुढे ती त्रिकोनी झाली. यात भाजप, राकाँ व सेना यांच्या अटीतटीची चुरस निर्माण झाली होती. तुमसर शहर, तालुका व मोहाडी तालुका कुणाच्या पारड्यात मते टाकेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. प्रथमच तुमसर बाहेरचा उमेदवार येथे निवडून आला आहे. राकाँने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राकाँने भाजपचे माजी आमदार मधूकर कुकडे यांना तिकीट देऊन चुरस निर्माण केली होती. तर सेनेकडून किसान गर्जनाचे संस्थापक राजेंद्र पटले यांना मैदानात उतरविले होते. नवनिर्वाचित आमदार चरण वाघमारे यांची तुमसर शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. शहरातील प्रमुख चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. साध्या वेशात असलेल्या आमदार वाघमारे यांच्या चेहऱ्यावर विजयाचे स्मित हास्य त्यांचा आनंद गगणात मावत नसल्याने सांगत होते. मिरवणुकीतून त्यांनी सर्वांचे अभिवादन स्विकारले. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान मतमोजणी केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्याने चरण वाघमारे यांना विजयी झाल्याची घोषणा करून प्रमाणपत्र दिले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले जिल्हा परिषद सभापती संदीप टाले यांनी वाघमारे यांना मिठी मारली. तेव्हा आनंदाश्रूंनी त्यांचे डोळे पाणावल्याने त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या प्रसंगाने उपस्थित कार्यकर्त्यांच्या मनात आनंद द्विगुणीत झाला. विजयी मिरवणुकीत जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी, जिल्हा परिषद सभापती संदीप टाले, तारिक कुरैशी, प्रदीप पडोळे, सभापती कलाम शेख, गीता कोंडेवार, निर्मला कापसे, खेमराज गभणे, प्रमोद घरडे, गजल शर्मा, अनिल जिभकाटे, अमित चौधरी यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)