शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
5
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
6
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
7
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
8
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
9
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
10
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
13
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
14
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
15
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
16
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
17
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
18
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
19
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
20
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?

आदिवासींनी एकत्र येऊन संस्कृती जपावी

By admin | Updated: October 31, 2015 01:40 IST

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता अनेक आदिवासीयांना विरमरण पत्करावे लागले. मात्र काळानुरूप आदिवासीयांचा बलीदान हा ईतिहास जमा झाला आहे.

शेडमाके शहीद दिन : राजे वासुदेवशहा यांचे प्रतिपादनतुमसर : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता अनेक आदिवासीयांना विरमरण पत्करावे लागले. मात्र काळानुरूप आदिवासीयांचा बलीदान हा ईतिहास जमा झाला आहे. त्यांचा कुणीही वाली उरला नाही, अशी स्थिती उद्भवल्याने आता आदिवासीयांनीच पुढाकार घेवून व संघटीत होवून संस्कृतीचे जतन करीत समाजावर होत असलेल्या अन्यायाविरूद्ध लढा पुकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राजे वासुदेवशहा यांनी केले. विर शहिद बाबुराव शेडमाके यांच्या १५ व्या शहिद दिनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी साहित्यिक मारोती उईके, आचार्य मोतीराव कंगाली, तहसिलदार सोनवाने, नायब तहसिलदार हरचिंद्र मडावी, बी.एस. सय्याम, आनंद मडावी, रविंद्र सलामे, नरेश आचले, कन्नाके, तलाठी मुल, डॉ. उईके, दिनेश इस्कापे, पिताराम उईके, राजकुमार परतेती, हरिष भलावी, ठाणेदार मनोज वाढीवे आदी मंचकावर उपस्थित होते. सर्वप्रथम तालुक्यातील आंबागड येथील ट्रॅक्टर ट्रॉली अपघातात मृत पावलेल्या आदिवासी बालकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बोगस आदिवासीयांना नोकरीत संरक्षण देणारा २४ आॅक्टोंबर २००१ च्या शासन निर्णयाचा सामूहिक निषेध करण्यात आला. रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येवून सर्वप्रथम नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे यांनी रक्तदान कार्यक्रमाची सुरूवात केली. दरम्यान ३५ आदिवासी बांधवांनी शिबिरात रक्तदान केले. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा व मार्गदर्शन करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात आदिवासी संस्कृतीचे रंगारंग व सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आयोजन करून आदिवासी संस्कृतीला उजाळा दिला. प्रास्ताविक अशोक उईके यांनी केले. संचालन धनराज ईळपाचे, कैलास गजाम यांनी तर, आभार हरिशचंद्र सयाम यांनी मानले. कार्यक्रम यशस्विकरिता विद्यार्थी संघाचे दिनेश मरस्कोल्हे कर्मचारी संघाचे मिताराम उईके, गोटुल समितीचे अविनाश धुर्वे आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)