सौंदड येथील घटना : एक ठार; ४१ जखमीसाकोली : छत्तीसगढ इथून देवदर्शन आटोपून अहमदनगरला जात असतांना ट्रॅव्हल्सच्या चालकाचे पहाटे संतुलन बिघडल्याने ट्रॅव्हल्स तलावात जाऊन उलटली यात एक जण ठार झाला तर ४१ प्रवाशी जखमी झाले. ही घटना सौंदड (जि. गोंदिया) येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुला आज शुक्रवारला पहाटे घडली. जखमीवर साकोली उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स क्रमांक एच एच १६ क्यु ९१५१ ने अहमदनगरवरुन छत्तीसगढला ५० प्रवाशी फिरायला गेले होते. फिरुन हे सर्वप्रवाशी परतीच्या प्रवासाला निघाले होते. मात्र अचानक चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने सौंदड येथील तलावाजवळ ट्रॅव्हल्स उलटली व सरळ तलावात गेली.घटनेची माहिती मिळताच साकोली पोलीस ताफयासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी सर्व जखमींना साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात संदिप वाघमारे (३५) रा. अहमदनगर याचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये दत्तात्रय शिंदे (५०), पंढरीनाथ शिंदे (४५) विठ्ठल घाडगे (६०) तिन्ही राहणार चांदा, अशोक घाडगे (५०) सुगन मस्के (५०) भानुदास मस्के, पारुबाई काळे (७०) चारही राहणार तेलकुरगांव, अल्का निभुते (६०) रा. लोणी, ओमकार चव्हाण (४४) रा. डांनगांव, चंद्रकला प्रभुणे (५५) रा. लोणी, काशा शिंदे (५५), गोजीराम शिंदे (६६) दोन्ही राहणार संगमनेर, मुक्ताबाई शेंडे (४०) रा. चांदा, शिवनाथ माटे (७०) रा. नेवासा, शोभा काळे (४०), जगन्नाथ पातळे (६०) दोन्ही रा. तेलकुटगांव, नामदेव मातकर (६५) रा. पाचेगांव, प्रताप सिंग (६३) रा. गंगापुर, भिमराव परवते (६५) रा. तेलगांव, अशोक सरोदे (५६) रा. भेंडा, भास्कर करडोळे (६५) रा. संघाई, काशीनाथ मातकर (४५) पाचेगाव, रावसाहेब शिंदे (४५) रा. चांदा, हिराबाई मातकर (६०) रा. पाचेगाव, पारबता भवर (५६) रा. ओल्लार, छबुबाई सांगडे (५०) रा. उस्थळ, चंद्रकला भेडेकर (५५) रा. तेलकुटगांव, मंगलु शेडगे (५५) रा. तेलकुटगाव, द्वारकाबाई बंशीकाळे (५५) रा. तेलकुटगांव, पारबताबाई वाघमोडे (५०) रा. पुकाना, पुष्पा साबणे (४५) रा. भेंडा, सुलोचना ताराडे (६५) रा. सुरेगाव, राईबाई कोकाते (९०) रा. शहापुर, रंबाबाई मस्के (६३), कुमोदीनी कुलकर्णी (६०), जयाबाई पगाळे (७०), पुष्पलता माटे (६०), पाचही राहणार तेलकुटगाव, इंदुबाई घुगे (४५) र. उस्थळगाव व बंश काळे (७०) रा. तेलकुटगाव अशी जखमींची नावे आहेत. पुढील तपास डुग्गीपार पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
ट्रॅव्हल्स तलावात कोसळली
By admin | Updated: March 26, 2016 00:24 IST