शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वीज तारा दुरुस्तीसाठी थांबविली वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 01:00 IST

भरमसाठ कर आकारणी करणाऱ्या महावितरण कार्यालयाकडे सुविधांची वाणवा असल्याचा प्रत्यय आसगाव येथील रस्त्यावरच्या तारा जोडताना घेतलेल्या ट्रकच्या आधाराने दिसून आले. कोटी रुपयांची वसुली करणाऱ्या महावितरण केंद्र उंचावरील तारा जोडणीसाठी स्वतंत्र साधन नाही.

ठळक मुद्देसीडी गाडीअभावी घेतला ट्रकचा आधार। साधनांअभावी कर्मचाऱ्यांची नवीन शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव : भरमसाठ कर आकारणी करणाऱ्या महावितरण कार्यालयाकडे सुविधांची वाणवा असल्याचा प्रत्यय आसगाव येथील रस्त्यावरच्या तारा जोडताना घेतलेल्या ट्रकच्या आधाराने दिसून आले.कोटी रुपयांची वसुली करणाऱ्या महावितरण केंद्र उंचावरील तारा जोडणीसाठी स्वतंत्र साधन नाही. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर विद्युत खांबावरील तारा लोंबकलेल्या आहेत. विद्युत मंडळाकडून तारा सरळ करण्याचे काम सुरु आहे. मात्र विद्युत मंडळाजवळ आसगाव कार्यालयाकडे हे काम करण्यासाठी सीडी गाडीच नाही. त्यामुळे येथील मंडळ कर्मचाऱ्यांनी तारा जोडणीसाठी नामी शक्कल लढविली. त्यांनी आसगाव बसस्थानकाजवळील पवनी आसगाव लाखांदूर रस्त्यावरील मालवाहू मोठ्या ट्रकलाच थांबविले. त्या ट्रकचा आधार घेत विद्युत मंडळाचे कर्मचारी वर चढून काही वेळा करीता वाहतुक थांबविली.लोंबकळलेल्या तारा सरळ करण्यासाठी मालवाहू ट्रकवर बसून लूजस्टॅन्ड लावण्यात आले. तेव्हा बघ्याची गर्दी जमली होती. आसगाव विद्युत वितरण मंडळ कार्यालयाचा सीडी गाडीची व्यवस्था करुन द्यावी, अशी मंडळ कर्मचाऱ्यांची मागणी आहे.मान्सून पूर्व कामांना गती देण्याची गरज आहे. शेतशिवारात अनेक ठिकाणी तारा, खांब हे धोकादायक स्थितीत आढळून येत असल्याने याकडे वीज वितरण कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मशागत कामासाठी अनेक शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आहे. अधिकाऱ्यांची उदासिनता कारणीभूत ठरत असल्याने त्यांचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. कंपनीने पावसाळ्यापुर्वी कामे पुर्ण करण्याची मागणी आहे.

टॅग्स :electricityवीज