शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साकोली तालुक्यात रेतीची तस्करी

By admin | Updated: June 18, 2015 00:38 IST

तालुक्यातील चुलबंद नदीच्या पात्रातून रेती मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे.

संजय साठवणे साकोलीतालुक्यातील चुलबंद नदीच्या पात्रातून रेती मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. ट्रॅक्टरमालक पावसाळ्यापूर्वीच बिना परवानगीने रेतीसाठा करून ठेवतात. पावसाळ्यात दोन हजार रुपये ट्रीप रेतीची विक्री करतात. त्यामुळे शासनाचा महसूल तर बुडतोच व सर्वसामान्यांनाही या महाग रेतीचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेतीच्या या तस्करीला आळा घालण्यात प्रशासनाला अपयश लाभले आहे. साकोली तालुक्यात दरवर्षी रेतीघाटाचा लिलाव होत असतो. शासनाला दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो. यावर्षीही साकोली तालुक्यातील रेतीघाट लिलाव झाले असले तरी रेतीची अवैध विक्री होत आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेतीघाटावरच जाऊन बरेचदा रेतीचे उत्खनन थांबविल्याचे व त्यांच्याकडून दंड वसूल केल्याचे सांगण्यात येते. पावसाळ्याला सुरुवात झाली असून रेती माफीयांनी आधीच रेतीचा साठा करवून ठेवला आहे. नसल्यामुळे हे रेतीमाफीया अगताच नियमबाह्य पद्धतीने रेतीसाठा करून ठेवीत आहेत. असे रेतीसाठा साकोली तालुक्यातील अनेक गावात दिसून येत आहेत. यात साकोली व सेंदूरवाफाचा या दोन गावात तर हे रेतीसाठे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. रेतीसाठा करताना महसूल प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असतानाही पैशाच्या जोरावर व महसूल अधिकाऱ्यांच्या आर्थिक संबंधामुळे ही परवानगी घेतली नाही. पावसाळ्यात हीच जमा केलेली रेती दोन ते अडीच हजार रुपये या भावाने विकली जाते हे विशेष. साकोली तालुका नक्षलग्रस्त असल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भत्ता दरमहा मिळतो. मात्र त्या कर्मचाऱ्याने मुख्यालयी राहणे अनिवार्य असते. मात्र साकोली तालुक्यातील तलाठी हे मुख्यालयी न राहता कुणी साकोली तर कुणी इतर गावाहून ये जा करतात. याचाही फायदा अवैध रेतीमाफीया व अवैध उत्खनन करणारे घेतात.संयुक्त कारवाई नाहीअवैख उत्खनन थांबविण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी माधवी घोडे यांनी पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे एक टिम तयार करून कार्यवाही करावी असे आदेश दिले होते. य आदेशाची अंमलबजावणी काही दिवसच झाली. आता मात्र महसूल विभागच कारवाईला जाताना दिसतात. पोलीस कारवाई करताना दिसत नाही.दंड भरण्यास दिला जातो अवधीशासनाच्या नियमानुसार अवैध रेती उत्खनन करताना सापडल्यास त्याचेवर फौजदारी गुन्हा नोंदवा असे आदेश असतानाही महसूल विभागाचे अधिकारी तसे न करता सरळ दंडाची पावती देऊन दंड वसूल करतात. यातही मोठी तफावत आहे. कुठे ३ हजार दोनशे तर कुणी ६ हजार ४०० रुपये दंड करतात. यातही पावती फाडल्यानंतर रेतीमाफीयांवर पैसे नसल्यास उधारी ठेवतात व नंतर पैसे वसूल करतात. यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा आहे.तरीही रेती उत्खनन सुरुचसाकोली तालुक्यातील काही रेतीघाट लिलाव झाले असले तरी जांभुळघाट, परसोडी, मोहघाटा या रेतीघाटावरून दररोज शेकडो ब्रास रेतीची अवैध उत्खनन केले जाते. एवढेच नाही तर परसोडी रेतीघाटावरून गोंडउमरी मार्गे नवेगाव बांध जि. गोंदिया येथेही रेतीची अवैध वाहतूक केली जाते हे विशेष.मागील वर्षी गोंडउमरीत रेतीसाठा जप्तमागील वर्षी साकोली तालुक्यातील गोंडउमरी येथे तहसीलदार डॉ.हंसा मोहबे यांनी पहिल्यांदाच रेतीसाठा जप्त केल्याची घटना आहे. यापूर्वी व त्यानंतर एकाही रेतीसाठ्यावर अशी कारवाई झालीच नाहीकेवळ २ पोलीस चौकीअवैध रेती उत्खननावर आळा बसविण्याकरिता शासनातर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यात ज्या रेतीघाटावरून रेतीची चोरी होते त्या ठिकाणी पोलीस चौकी स्थापन करून नियंत्रण ठेवावे असे आदेश असताना साकोली तालुक्यातील परसोडी व सासरा या दोनच रेती घाटाजवळ पोलीस चौक्या स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे उर्वरीत रेतीघाट रेतीत मोकळे आहेत. त्यामुळे साकोली तालुक्यात पुन्हा चार ते पाच पोलीस चौक्याची गरज आहे.यावर्षी अवैध रेतीमाफियाकडून २५ लक्ष रु. एवढी दंडाची रक्कम गोळा केली असून अवैध रेतीउत्खनन रोखण्यासाठी ते विशेष प्रयत्न करीत आहेत.- डॉ.हंसा मोहणे, तहसीलदार साकोली.रेती स्टॉक करण्यासाठी महसूल विभागाची परवानगी लागते. मात्र अशी परवानगी साकोली तालुक्यात कुणालाही देण्यात आली नाही. अनधिकृतपणे रेतीस्टॉक आढळल्यास त्याचेवर कारवाई करू.- दिलीप तलमले, उपविभागीय अधिकारी, साकोली