वाहनांची संख्या वाढली : मुख्य मार्गावरील अतिक्रमण निर्मूलनासाठी पुढाकाराची गरज भंडारा : जिल्ह्यातील मोजके रस्ते वगळल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साईड वायू, कानठळ्या बसवणारे कर्ण कर्कश हॉर्न, वाढते अपघात असे प्रश्न असले तरी दिवसेंदिवस नव्या वाहनांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वाहनांची तोकडी सोय आणि खासगी वाहनांच्या संख्येत दरवर्षी पडणारी भर हेच या मागचे मुख्य कारण आहे. खासगी वाहनांच्या तुलनेत सार्वजनिक वाहनांची संख्या केवळ १० टक्केही नाही. भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाख ७५,४१४ असून दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीही वाढत आहे,, अशी ओरड केली जाते. मात्र गेल्या १० वर्षांत जिल्ह्याच्या लोकसंख्या कमालिने वाढली. याच्या तुलनेत खासगी वाहनांतही मोठी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हेच वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. सन २०१३-१४ मध्ये वाहनांची संख्या १६,३२१ होती. वाहतूक कोंडी वा प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी खासगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था प्रभावी होते. सन २०१४ -१५ मध्ये जिल्ह्यात १४ हजार ९७२ दुचाकी खरेदी करण्यात आली. यासह इतर वाहने मिळून जिल्ह्यात एकुण वाहन १६,९५२ एवढी आहेत. सन २०१३-१४ मध्ये १४,४७८ दुचाकीसह एकुण १६,३२१ वाहने होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुचाकींच्या संख्येत ४९७ ने वाढ झाली आहे. सन २०१५ मध्ये वाहनांची एकूण संख्या १ लक्ष ८१ हजारांच्या घरात पोहोचली आहे. (प्रतिनिधी)
‘ट्रॉफिक’ने वाढविली डोकेदुखी !
By admin | Updated: February 12, 2016 01:20 IST