शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील वाहतूक कोंडी ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:41 IST

शहरातील मुख्य रस्त्यांवर व प्रमुख चौकात बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभे केली जात असल्यामुळे सातत्याने वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे दरवर्षी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवूनही वाहतूकीची समस्या सुटलेली नाही.

ठळक मुद्देप्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष : नागरिकांना पायी चालणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील मुख्य रस्त्यांवर व प्रमुख चौकात बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभे केली जात असल्यामुळे सातत्याने वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे दरवर्षी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवूनही वाहतूकीची समस्या सुटलेली नाही.शिवाय सकाळी सायंकाळच्यावेळी शाळकरी विद्यार्थी वृध्द नागरिक रस्त्यावरुन ये-जा करीत असताना अती वेगाने येणारे दुचाकीस्वार ट्रॅक्टर चालकांच्या भीतीने रस्त्यावरुन चालताना जीव मुठीत घेवून चालावे लागते. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांमधून होत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव रोड तसेच महात्मा गांधी चौकात वारंवार होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे वाहनधारकांसह सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र याकडे पोलीस प्रशासनाची मात्र दुर्लक्ष होत आहे. गांधी चौकात पोलीस स्टेशनसमोरच वाहनाची लांबच लांब रांग लागत असताना पोलीस कारवाई करताना दिसून येत नाही.नागरिकांची मानसिकता बदलेनाजवळपास दहा वर्षापुर्वी रस्त्याच्या एका कडेला वाहने पार्क केली जावी, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात कोंडलेला रस्त्याचा श्वास आधीच गुदमरलेला असतांना नागरिकांचीही मानसिकता बदलायला तयार नाही. अशा स्थितीत वाहतुक शाखेचे कर्मचारीही हतबल दिसतात. एकट्या पोस्टआॅफीस चौकातही अशीच स्थिती दिसून येते. ऐतिहासीक वारसा लाभलेल्या भंडारा शहरातील मुख्य रस्त्याचे हाल झाले असताना त्यावर कायम तोडगा निघालेला नाही.रस्त्यावर जनावरांचे बस्तानदीड लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचे वास्तव्य दिसून येते. अशावेळी लहान मोठे अपघातही घडले आहेत. शहरात बेवारस जनावरांसाठी कांजी हाऊसची व्यवस्था असतानाही पालिका प्रशासनाने त्याच्या देखभालीकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी मोकाट जनावरे रस्त्यावर फिरुन रहदारीला अडथळा निर्माण करीत असतात. यावर पालिका प्रशासन गांभिर्याने निर्णय घेणार काय असा सवालही उपस्थित होतो.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी