शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
3
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
4
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
5
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
6
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
7
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
8
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
9
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
10
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
11
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
12
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
13
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
14
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
15
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
16
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
17
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
18
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
19
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
20
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...

होळी सणाची परंपरागत घानमाकड झालीय पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:00 IST

होळीची चाहूल लागली की ग्रामीण भागातील तरुणांची घानमाकड तयार करण्याची ओढ लागायची. पळसाचे विशिष्ट आकाराचे लाकूड आणून घानमाकड तयार करायचे. गावातील चौकात घानमाकड बसवून त्यावर गरागरा फिरण्याचा आनंद घेतला जायचा. तीन दशकापूर्वी गावागावात दिसणारे दृश्य आता नामशेष झाले आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात घानमाकड लुप्त झाली असून नवी पिढी गरगर फिरण्याच्या आनंदाला मुकली आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात असायची धमाल : नवी पिढी मुकतेय घानमाकडीवर गरगर फिरण्याच्या आनंदाला

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : होळीची चाहूल लागली की ग्रामीण भागातील तरुणांची घानमाकड तयार करण्याची ओढ लागायची. पळसाचे विशिष्ट आकाराचे लाकूड आणून घानमाकड तयार करायचे. गावातील चौकात घानमाकड बसवून त्यावर गरागरा फिरण्याचा आनंद घेतला जायचा. तीन दशकापूर्वी गावागावात दिसणारे दृश्य आता नामशेष झाले आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात घानमाकड लुप्त झाली असून नवी पिढी गरगर फिरण्याच्या आनंदाला मुकली आहे.होळी हा सण आला की, ग्रामीण भागातील तरुणाई उत्साहात दिसायची. शेणापासून चाकोल्या तयार करण्यापासून पळस फुल जंगलातून आणून रंग तयार करण्याची लगबग सुरु व्हायची. यासोबतच तरुणांच्या आवडीचा प्रकार म्हणजे घानमाकड होय. पळसाच्या झाडापासून तयार होणारी ही घानमाकड काही दशकापूर्वी तरुणांचा जीव की प्राण असायची. घानमाकड तयार करण्यासाठी सर्वप्रथम जंगलात जाऊन विशिष्ट आकाराचे पळसाचे झाड शोधायचे. व्ही आकाराची फांदी शोधून ती तोडली जायची. गावात आणल्यानंतर मैदानात घानमाकडसाठी खुंट रोवला जायचा. तर व्ही आकाराच्या लाकडाला मधोमध कोरून छिद्र तयार केले जायचे. रोवलेल्या खुंटावर आडवी व्ही आकाराची फांदी ठेवून त्यावर दोन्ही बाजूला बसून तिला एक सहकारी गरगरा फिरवायचे. हा प्रकार होळीच्या आठ दिवसांआधीपासून सुरु व्हायचा. होळीच्या दिवशी घानमाकड होळीमध्ये टाकली जायची. मात्र अलिकडे घानमाकड लुप्त झाली. तरुणाईचा हा निखळ आनंदही संपला.निमगावच्या शिक्षकांनी सजवली घानमाकडहसत खेळत ज्ञानार्जन व्हावे, नैसर्गिक आनंद मिळावा या हेतूने पारंपारिकतेचा आधार घेत लुप्त होत चाललेल्या घानमाकडीच्या खेळाला निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी पुनरुज्जीवन दिले. मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांनी घानमाकड तयार केली. शाळेच्या परिसरात ही घानमाकड लावून विद्यार्थ्यांना घानमाकडीवर बसण्याचा आनंद लुटता आला. यासाठी शिक्षक रामकृष्ण कमाने, विजय डाभरे, भास्कर गरपडे, शिक्षिका मीरा मोहतुरे यांनी सहकार्य केले. गत आठ दिवसांपासून ही घानमाकड सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र झाला आहे. यासाठी निमगावचे सरपंच रुपचंद चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनीही सहकार्य केले. आता विद्यार्थी घानमाकडीवर बसून आनंद लुटत आहेत.