शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामा सुरू असताना ट्रॅक्टरचालकाने काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:38 IST

गावातील मुख्य रस्त्याने रेती भरुन जाणारा ट्रॅक्टर तलाठी सांगोळे यांनी भर रस्त्यात पकडला. पंचनाम्याची कारवाई करीत असतांना ट्रॅक्टर रोडच्या कडेला उभे करण्याच्या बहाणा करुन चालकाने ट्रॅक्टरच पळवीला असल्याची धक्कादायक घटना दिघोरी येथे आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देदिघोरी/मोठी येथील प्रकार : वाळू माफियांची मुजोरी, तलाठ्यांनी दिली तहसीलदारांना माहिती

मुकेश देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी/मोठी : गावातील मुख्य रस्त्याने रेती भरुन जाणारा ट्रॅक्टर तलाठी सांगोळे यांनी भर रस्त्यात पकडला. पंचनाम्याची कारवाई करीत असतांना ट्रॅक्टर रोडच्या कडेला उभे करण्याच्या बहाणा करुन चालकाने ट्रॅक्टरच पळवीला असल्याची धक्कादायक घटना दिघोरी येथे आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.दिघोरीच्या चुलबंद नदीची रेती अत्यंत चांगल्या दर्जाची असून येथील रेतीला अर्जुनी/मोरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून वाळू माफीया गावातील मुख्य रस्त्याने वाहतुक करुन रेती चोरीचा उद्योग करीत आहेत. अशातच आज तलाठी सांगोळे सदर रस्त्याने जात असतांना रेतीने भरलेला ट्रॅक्टर त्यांना दिसला. सदर रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरचा क्र. एम एच ३६ एल ५१७१ असुन ट्रालीचा क्रमांक एम एच ३६ जी २४६० हा आहे.ट्रॅक्टर ज्या ठिकाणी पकडण्यात आला त्या ठिकाणी अडचणीचा रस्ता असून मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्रीत जमा झाले होते. त्यामुळे सदर ट्रॅक्टर शेडच्या कडेला उभा करण्याच्या उद्देशाने चालकाने चालू केला व धूम ठोकून ट्रॅक्टरसहीत पळ काढला. घडलेल्या या प्रकाराबद्दल तलाठी सांगोळे यांनी पोलीस ठाणे दिघोरी येथे कुठलीही माहिती दिली नाही व मदत मागविली नसल्याची माहिती मिळाली.याबाबत तलाठी सांगोळे यांना भ्रमणध्वनीवर माहिती विचारली असता ते म्हणाले तहसीलदार लाखांदूर यांना सदर घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली असून सदर ट्रॅक्टरधारकावर कारवाई करण्याचे संकेत दिले असल्याचे सांगितले.पळून जाणाऱ्या ट्रॅक्टरवर महसुल विभाग व पोलीस विभाग काय कारवाई करते याकडे दिघोरीवासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :sandवाळू