शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

पर्यटन विकास केवळ एक टक्का

By admin | Updated: September 27, 2016 00:29 IST

नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या भंडारा जिल्ह्यात पर्यटनस्थळाच्या विकासाबाबत मात्र नशिब बलवत्तर नाही.

आज विश्व पर्यटन दिवस : मिळाला फक्त एक कोटीचा निधीइंद्रपाल कटकवार भंडारानैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या भंडारा जिल्ह्यात पर्यटनस्थळाच्या विकासाबाबत मात्र नशिब बलवत्तर नाही. जिथे शंभर कोटींच्या वर निधी उपलब्ध व्हायला हवा तिथे फक्त एक टक्का निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा निधी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. दि. २७ सप्टेंबर हा दिवस विश्व पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची होत असलेली सातत्याने उपेक्षा व गरज यावर लोकमतने उहापोह केला असता निधीचा वाणवा व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या दोन गोष्टी प्रखरतेने जाणवल्या.पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन २०१५- १६ मध्ये एकूण २२५ कोटींचा निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. त्यापैकी ७० टक्के निधी उपलब्ध करण्यात आला असून त्यापैकी भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला एक कोटी रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता देवून मंजूर करण्यात आला आहे. यात भंडारा जिल्ह्यातील वाही जलाशय, जंगल येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याकरिता ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच बालसमुद्र व बुध्दीष्ट आॅर्चिलॉजीकल साईट पवनी येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठीही ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.विदर्भाची काशी दुर्लक्षितभंडारा जिल्ह्याचा इतिहास फार प्राचीन आहे. प्राचीन मंदिराची नगरी विदर्भाची काशी म्हणून पवनी यासोबतच धार्मिक श्रध्दास्थान असलेले गायमुख, चांदपूर, श्री नर्सिंग टेकडी (माडगी), कोरंभी, रावणवाडी जलाशय, अड्याळ येथील हनुमंत मंदिर, प्रतापगड टेकडी, चकारा देवस्थान, लाखापाटलाची पहाडी (कोका जंगल), अंभोरा, दुर्गाबाई डोह (गडकुंभली), ढिवरढूटी (पवनी), चप्राड (पहाडी), दशबल पहाडी (हत्तीडोई), पांडे महाल भंडारा, झिरी, बंदरझिरा, सोनी नदी संगम, गिरोला पहाडी, श्री भृश्रृंड गणेश मंदिर भंडारा, ढुढरी जलाशय, मागली बांध, उत्तर वाहणी, मांढळ, डाकराम सुकडी, कामठा आश्रम, चारभट्टी (पुयार), सिंदपूरी-रुयाड, खोडगाव, चौंडेश्वरी देवी मोहाडी, आंबागड यासह अनेक पर्यटन स्थळे जिल्ह्यात आहेत. मात्र जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची उपेक्षा सातत्याने होत आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत जिल्ह्याला एक कोटींचा निधी मिळाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासाबाबत विकास आराखडा व प्रारुप तयार करण्यात आला आहे. त्या दृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे.- राजेश गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी, भंडाराविदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात येतो. विदर्भाला कधीही झुकते माप दिला जात नाही. विदर्भातील पर्यटन स्थळाचा विकास होणार तरी कसा हाच मुख्य सवाल आहे.? संस्थांच्या प्रयत्नांमुळे शासनाने लक्ष दिले आहे. लढा तिव्र करावा लागेल.- मो. सईद शेख, पर्यटन व इतिहास अभ्यासक, भंडारा