शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

लहान महादेव गायमुख तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

१९९९ मध्ये निसर्ग पर्यावरण प्रेमी मो. सईद शेख यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गायमुख तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी विनंती केली. त्या अनुषंगाने राज्य शासनाने गायमुख तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला ‘क’ वर्ग दिला. येथील विकासासाठी प्रथम २५ लाख व त्यानंतर ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून काही विकास कामे केली. परंतु त्यानंतर मात्र या तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे येथे अनेक विकासकामे रखडलेली आहेत.

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि लहान महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुमसर तालुक्यातील गायमुख तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास रखडला असून, येथे आतापर्यंत राज्य शासनाने केवळ ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाने या तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला ‘क’ वर्ग म्हणून १९९९ मध्ये मंजुरी दिली; परंतु तीर्थक्षेत्राचा विकास झाला नाही.सातपुडा पर्वत रांगात निसर्गसौंदर्याने नटलेले गायमुख प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, तुमसरपासून केवळ १५ किलोमीटर अंतरावर आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. यात्रेला २०० वर्षांचा इतिहास आहे. भंडाऱ्याचे दिवंगत यादवराव पांडे यांच्या काळापासून यात्रा भरत असून, पांडे यांची नवीन पिढी व जिल्हा प्रशासनातर्फे येथे यात्रेची संपूर्ण व्यवस्था करण्यात येते. १९९९ मध्ये निसर्ग पर्यावरण प्रेमी मो. सईद शेख यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गायमुख तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी विनंती केली. त्या अनुषंगाने राज्य शासनाने गायमुख तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला ‘क’ वर्ग दिला. येथील विकासासाठी प्रथम २५ लाख व त्यानंतर ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून काही विकास कामे केली. परंतु त्यानंतर मात्र या तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे येथे अनेक विकासकामे रखडलेली आहेत. महाशिवरात्रीला येथे मध्य प्रदेश व विदर्भातून मोठ्या संख्येने येथे भाविक येतात. मात्र येथे सुविधा नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.गायमुख येथे जाण्यासाठी असलेला रस्ता उखडला असून भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विकासाकडेही दुर्लक्ष आहे.

गायमुख यात्रेचा इतिहास - प्राचीन काळी येथे एक ऋषीने भगवान शिवाची तपस्या केली. त्यामुळे स्थळ पवित्र असल्याचे मानले जाते. येथे पंचमुखी भोलाशंकर, हनुमान, मकरध्वज, अंबाबाई, गोरखनाथाचे मंदिर असून, पंचमुखी भोलाशंकराचे मंदिर भारतातील विद्यमान १८ मंदिरांपैकी एक आहे. मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे. पार्वतीची प्राचीन विहीर पहाडावर असून, भाविक येथे भेट देतात. पलीकडील जंगलात मिनी नैनिताल, पांगडी जलाशय डोळ्यांचे पारणे फेडून जाते. गाईच्या मुखातून पर्वतीय झरा सतत वाहून एका जलकुंभात पडते. यावरून या स्थळाचे नाव गायमुख असे पडले आहे.

 

टॅग्स :tourismपर्यटन