शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शिलाईचे कपडे आणण्यासाठी जात असलेल्या ११ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 13:42 IST

Bhandara News शिलाईचे कपडे आणण्यासाठी जात असलेल्या ११ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर एका ५५ वर्षीय अत्याचार केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यात घडली.

ठळक मुद्देलाखांदूर तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : शिलाईचे कपडे आणण्यासाठी जात असलेल्या ११ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर एका ५५ वर्षीय अत्याचार केल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली. ही घटना ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलींच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचारस सह अन्य विविध कलमान्वये व पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करुन अटक केली आहे. मधुकर हरी रंगारी (५५) रा ओपारा असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास दोन्ही अल्पवयीन मुली शिलाईला दिलेले कपडे आणण्यासाठी जात होत्या. दरम्यान मधुकर रंगारी याने दोन्ही अल्पवयीन मुलींना स्वतःच्या घरी जबरदस्ती खेचून दार बंद केले. यावेळी दोन्ही मुलींनी आरडाओरड केली असता त्यांचे तोंड दाबून मारहाण केली. तसेच दोघांवर अत्याचार केला. मुलींच्या ओरडण्याचे आवाज येतात घराशेजारील लोकांनी खिडकीतुन डोकाऊन पाहिले असता मधुकर हा दोन्ही अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत असल्याच्या स्थितीत आढळून आला.

घटनेची माहिती पीडित मुलींच्या पालकांना होताच त्यांनी तात्काळ लाखांदूर पोलिस ठाणे गाठून आरोपीविरोधात गुन्ह्याची नोंद केली. दोन्ही पीडित अल्पवयीन मुलींचे आरोग्य तपासणी अहवालावरून लाखांदूर पोलिसांनी मधुकर रंगारी विरोधात विविध कलमांसह पॉक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक केली आहे. तपास लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक विरसेन चहांदे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी