शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

शौचालये ठरली नावापुरतीच

By admin | Updated: November 25, 2014 22:50 IST

जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता स्वच्छतागृह व शौचालये तयार करण्यात आली. मात्र बहुतांश शाळांमधील शौचालय बंद अवस्

वापरच नाही : शाळांमधील शौचालये घाणीच्या विळख्यातभंडारा : जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता स्वच्छतागृह व शौचालये तयार करण्यात आली. मात्र बहुतांश शाळांमधील शौचालय बंद अवस् थेतच असून शौचालयांचा वापरच होत नाही. परिणामी शाळांमधील ही शौचालये नावापुरतीच असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे .जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये सर्व विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळांमधील विद्यार्थ्यांना शौचासाठी बाहेर जावे लागू नये म्हणून शिक्षण विभागाने शाळांमध्ये शौचालय निर्मितीचे निर्देश दिले होते. त्यानुसार बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता शाळेत शौचालयांची व स्वच्छतागृहांची उभारणीही केली. तथापि बहुतांश शाळांमध्ये बोअरवेलला पाणी येत नसल्याने तर काही ठिकाणी शाळेत शिपाई नसल्याने या शौचालय व स्वच्छतागृहांची स्वच्छता करणार तरी कोण, म्हणून शौचालयाचा वापरच केला जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक शाळांमधील शौचालयांचा आता वापरच होत नसल्याने ते बंद अवस्थेत दिसत आहे. काही शाळांमध्ये पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे पाण्याअभावी विद्यार्थी शौचालयाचा उपयोग घेऊ शकत नाही. त्यामुळे शाळांमधील शौचालये नावापुरतीच उरल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल जात आहे. पाणी खोल गेल्याने अनेक शाळांमधील बोअरवेल आताच बंद पडलेले आहे. परिणामी शौचालयाकरिता पाणी कोठून आणायचे असा प्रश्न शाळांसमोर पडला आहे. (प्रतिनिधी)