लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा रविवारला दुपारी २ वाजता अग्रसेन भवन, दुर्गा नगर तुमसर येथे आयोजित केले आहे. मेळाव्याला राकाँचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल पक्ष संघटन व सदस्य नोंदणी अभियान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर सांबारे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात तुमसरचे माजी आमदार अनिल बावनकर हे आपल्या सहकाºयांसह राकाँत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती जिल्हा महासचिव विजय डेकाटे यांनी दिली. भंडारा व गोंदिया जिल्ह्याची बदलती राजकीय समीकरणाच्या अनुषंगाने खासदार पटेल मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वच राजकीय पदाधिकाºयांचे लक्ष लागले आहे.
तुमसरात आज राष्ट्रवादीचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:17 IST
तुमसर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा रविवारला दुपारी २ वाजता अग्रसेन भवन, दुर्गा नगर तुमसर येथे आयोजित केले आहे.
तुमसरात आज राष्ट्रवादीचा मेळावा
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल करणार मार्गदर्शन