दिवाळी अंधारात : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेशतुमसर : शालार्थ वेतन प्रणाली तथा नियोजनाचा अभावामुळे जिल्ह्यातील आठ अनुदानित आश्रमशाळा व तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक सहा शाळेतील सुमारे २६५ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहेत. दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचा आदेश असतानी येथे त्या आदेशाला हरताळ फासला गेला आहे.भंडारा जिल्ह्यात अनुदानीत आठ आदिवासी आश्रमशाळा आहेत. यात तुमसर तालुक्यातील चार शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यात चांदपूर, आंबागड, येरली, पवनारखारी, माडगी, खांबा, जांभळी, कोका जंगल, आदर्श आमगाव या शाळांचा समावेश आहे. जुलै ते आॅक्टोबर चार महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. शालार्थ वेतन प्रणालीचे भूत संबंधित कार्यालयाच्या मानगुटीवर बसलेले आहे. या आश्रमशाळेतील सुमारे २०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली.शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन मिळावे याकरिता शालार्थ वेतन प्रणाली चार महिन्यापूर्वीच लागू झाली होती, परंतु आदिवासी प्रकल्प कार्यालयाने ही प्रणाली योग्य राबविल्याचे दिसत नाही. जिल्ह्यात केवळ आठ खासगी अनुदानीत आश्रमशाळा आहेत. दुसरीकडे शासकीय आश्रमशाळांचे वेतन मात्र दरमहिन्याला वेळेवर होते हे विशेष.तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक सहा शाळांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन थकीत झाले आहेत. दिवाळीपुर्वीच वेतन होणे गरजेचे होते. जिल्हा परिषद भंडारा यांनी दि.२० आॅक्टोबर रोजी तुमसर पंचायत समितीकडे वेतन पाठविल्याची माहिती आहे. दि.२१ आॅक्टोबरला खंडविकास अधिकारी दिवाळीकरीता कोल्हापूरकडे रवाना झाल्या त्यामुळे सप्टेंबरचे ६५ कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही, अशी माहिती आहे. वेतनाकरिता पूर्वी जिल्हा परिषदने विलंब केला. येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. नियोजनाचा अभाव येथे दिसून येतो. संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यपूवर्ती केली नाही. (तालुका प्रतिनिधी)
२६५ कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत
By admin | Updated: October 26, 2014 22:34 IST