शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

टिप्परने दोघांना चिरडले, नागरिकांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 21:49 IST

भरधाव टिप्परने चिरडल्याने दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाल्याची घटना पवनी तालुक्याच्या बेटाळा गावाजवळ सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले. तब्बल सहा तासानंतर मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले, तोपर्यंत मृतदेह रस्त्यावरच होते.

ठळक मुद्देबेटाळाची घटना : रस्त्यावर पेटविले टायर, वाहनांच्या दोन किलोमीटरच्या रांगा, सहा तास मृतदेह होते रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : भरधाव टिप्परने चिरडल्याने दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाल्याची घटना पवनी तालुक्याच्या बेटाळा गावाजवळ सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले. तब्बल सहा तासानंतर मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले, तोपर्यंत मृतदेह रस्त्यावरच होते.श्यामसुंदर बाळाजी रायपूरकर (५०), परसराम कवडू दोहतरे (६५) रा. वायगाव ता. पवनी अशी मृतांची नावे आहेत. पवनी येथील एक लग्न समारंभ आटोपून ते आपल्या दुचाकीने गावी जात होते. बेटाळा गावाजवळील पेट्रोलपंपासमोर राँग साईड आलेल्या एका टिप्परने या दोघांना धडक दिली. दोघेही टिप्परच्या समोरच्या चाकाखाली येवून अक्षरश: चिरडले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती होताच संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर टायर पेटवून पवनी- नागपूर राज्यमार्ग रोखून धरला. या घटनेची माहिती होताच पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील पेटते टायर बाजूला करण्यात आले. परंतु संतप्त जमावापुढे त्यांचे काहीही चालत नव्हते. मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची मागणी आंदोलकानी लावून धरली. नागरिकांचा संताप बघता भंडारा, अड्याळ येथून अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि उपविभागीय महसूल अधिकारी प्रभाकर टिकस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर घटनास्थळी दाखल झाले.अपघाताचे वृत्त कळताच शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर आंदोलनस्थळी पोहोचले. मृतकांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी लावून धरली. शेकडो नागरिक रस्त्यावर ठिय्या देवून बसले आहेत. आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरु करण्यात आली. परंतु आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असून जोपर्यंत मदत मिळत नाही. तोपर्यंत मृतदेह जागेवरुन हलविणार नाही. अशी भूमिका घेतली. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास यावर तोडगा निघाला. ट्रक मालकाकडून मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी तीन लाख रोख देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत प्रत्येकी १० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्याचे ठरविण्यात आले. तसेच तहसीलदारांची गौण खनीज प्रकरणात चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यावरुन आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनामुळे राज्यमार्गावर दोन्ही बाजूला २ किमीपर्यंत वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला. शामसुंदर रायपुरकर आणि परसराम दोहतरे हे दोघेही शेतमजूरी करणाऱ्या कुटूंबातील आहे. घटनास्थळावर चाकाखाली असलेले मृतदेह पाहून प्रत्येकजण हळहळत होता.तहसीलदारांना निलंबित करा - नरेंद्र भोंडेकरअवैध गौण खनीज उत्खननाचे दोन निष्पाप जीव बळी गेले असून या सर्व प्रकाराला पवनीचे तहसीलदारच जबाबदार आहेत. त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी घटनास्थळी केली. ट्रक मालकाकडून मृतकांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. जोपर्यंत मागणी पुर्ण होत नाही. तोपर्यंत मृतदेह जागेवरुन हलू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.