शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

बुरुड कामगारांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: July 27, 2015 00:46 IST

बुरुड कामगार हिरव्या बांबूपासून कलाकुसरीच्या विविध वस्तू तयार करण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय करीत आहेत.

शासनाचे उदासीन धोरण : समस्या सोडविण्याची मागणीतुमसर : बुरुड कामगार हिरव्या बांबूपासून कलाकुसरीच्या विविध वस्तू तयार करण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय करीत आहेत. लोकांच्या आवश्यक गरजा पूर्ण करुन आपले व आपल्या मुलाबाळांचे पालनपोषण करण्याचे काम करीत आहे. परंतु त्यासाठी लागणारी मुख्य संपत्ती म्हणजे हिरवा बांबू होय. हिरवा बांबू मिळविण्यासाठी बुरुड कामगारांना मोठा संघर्ष करावा लागत आहे व अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे बुरूड समाजावर उपासमारीची पाळी आली आहे.बुरुड कामगारांना बांबूपासून काम करण्यासाठी सरळ ठोकळ व हिरव्या बांबूची आवश्यकता असते. परंतु जिल्ह्यातील वनविभागात ठोकळ व सरळ बांबू उपलब्ध नसल्यामुळे अनेक वर्षांपासून बारिक स्वरुपाचा निकृष्ट दर्जाचा बांबू पुरवठा करण्यात येत आहे. यातून बुरुड कामगारांची दिशाभूल करण्यात येत आहे. यामुळे बुरुड कामगारांच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वनविभागाच्या चुकीच्या धोरणामुळे बुरुड कामगारांची प्रगतीऐवजी दुर्गतीकडे वाटचाल होताना दिसत आहे. निकृष्ट दर्जाच्या बांबू पुरवठ्यामुळे बुरुड कामगारावर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे. निस्तार बांबूचे दर कमी करावाढत्या महागाईमुळे दिवसेंदिवस बुरुड कामगार नैराश्येच्या वातावरणात पसरताना दिसत आहे. त्यांना शासनाकडून कोणत्याच प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे व बांबू दरामध्ये दुप्पट वाढ केल्याने बुरुड कामगारांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. १0 रुपयांचा बांबू २0 रुपये व २0 रुपयांचा बांबू ४0 रुपये प्रति नग याप्रमाणे विकत घ्यावा लागत आहे. कधी कधी विकत घेतलेल्या बांबूपासून काम केल्यानंतर बांबूची मुद्दल किंमत वसूल होत नाही व एवढा महागडा बांबू विकत घेणे त्यांना परवडत नसल्यामुळे काय करावे, असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित होत आहे. एवढा मोठा कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, असा विचार त्यांच्या मनात सतत असतो. बांबूच्या दरात दुप्पट वाढ केल्याने बुरुड कामगारांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे.त्यामुळे बांबूचे दर तात्काळ कमी करावे अशी मागणी आहे.बुरुड कामगारांना बांबूपासून काम करण्यासाठी हिरवा व ताजा बांबूची गरज पडत असते. परंतु अनेक वर्षांपासून वनविभागाकडून बुरड समाजबांधवांना वर्षाला एकदा बांबू पुरवठा केला जात आहे व तोच बांबू वर्षभर बुरुड कामगारांना विकला जात आहे. त्यामुळे त्यांना बांबूची आवश्यकता पडते. (तालुका प्रतिनिधी) वनविभागाने गोदाम तयार करावे बांबू सुरक्षित ठेवण्यासाठी वनविभागाकडे कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे निस्तार बांबू वनविभागाच्या खुल्या जागेवर टाकला जातो. त्या बांबूंची काळजी वन अधिकाऱ्यांकडून घेतली जात नसल्यामुळे दरवर्षी पाळ्यामुळे हजारो बांबू खराब होतात. यात शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होते. पयार्याने बुरुड कामगारांचेसुद्धा नुकसान होते. वनविभागाच्या दुर्लक्षेमुळे बुरड कामगारांना पावसाळ्यात बांबूपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे बांबू सुरक्षित ठेवण्यासाठी गोदाम किंवा शेड तयार करावे व बुरुड कामगारांना बाराही महिने हिरवा बांबूचा तुटवडा पडू नये, याची दखल घेण्यात यावी, अशी मागणी आहे. निस्तार बांबू ठेकेदारांना देऊ नये बुरुड कामगारांना पुरवठा करण्यात येणारा बांबू शेतकऱ्यांना किंवा इतर ठेकेदारांना दिल्यास त्याचा गैरफायदा वाटप करणारे अधिकारी घेतात. शेतकऱ्यांना व ठेकेदारांना ज्यादा दराने बांबु विकतात व लाखो रुपयांची कमाई करतात. अशा अनेक तक्रारी यापूर्वीच बुरुड कामगारांकडून करण्यात आल्या आहेत. यामध्ये बांबू वाटप करणारे अधिकारी उत्तम दजार्चा बांबू ठेकेदारांना विकतात व बारीक बांबू बुरुड कामगारांना देतात. यात बुरुड कामगाराची मरमर होताना दिसते. तेव्हा बुरुड कामगारांचा बांबू इतारांना देण्यात येऊ नये. इतरांसाठी वेगळ्या बांबूची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आहे.मागणीनुसारच निस्तार बांबूचा पुरवठा करावाबुरुड कामगारांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आवश्यकतेपेक्षा जास्त बांबूंचा एकाच वेळी पुरवठा केला जातो. त्यामुळे बुरुड कामगार आपल्या ऐपतीनुसार बांबू विकत घेतो. जास्तीचा बांबू एकाच वेळी विकत घेऊ शकत नसल्यामुळे बांबू शिल्लक पडतो. तो खराब होऊन सडतो. यात शासनाचे नुकसान होते. वनविभागातर्फे बुरुड कामगारांना बांबूची गरज नाही, असे गृहित धरले जाते व बांबू रजिस्टरवर स्टॉक दाखविला जातो. बांबूसाठी संघर्ष करावा लागतो. यासाठी बुरुड कामागरांच्या मागणीनुसार बांबूचा पुरवठा करणे गरजेचे आहे.