शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

शक्तीप्रदर्शनानंतर थंडावल्या प्रचारतोफा

By admin | Updated: October 31, 2015 01:42 IST

ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून होणारा प्रचाराचा शहरातील कोलाहल थांबला आहे. तथापि, आजची रात्र उमेदवारांचे भाग्य बदलणारी आहे.

आजची रात्र वैऱ्याची : मोहाडी, लाखनी, लाखांदुरात रॅली, नगरपंचायतींची निवडणूक अनेकांसाठी प्रतिष्ठेचीमोहाडी/लाखनी/लाखांदूर : ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून होणारा प्रचाराचा शहरातील कोलाहल थांबला आहे. तथापि, आजची रात्र उमेदवारांचे भाग्य बदलणारी आहे. व्यक्तीगत आमिषांचे पीक रात्रभर पेरून सुर्याेदयाची प्रतिक्षा उमेदवार करणार आहेत.नगर पंचायतची निवडणूक राजकीय पक्षानी प्रतिष्ठेची बनवली आहे. नगर पंचायतच्या निकालावर पक्षांना बळ देणारं ठरणार आहे. बारा दिवस प्रचाराचा प्रवास आज सायंकाळी पाच वाजता संपला. दीड आठवडा चाललेला कलकला थांबला आहे. लक्षण लहान प्रभाग असताना सुद्धा प्रभागाशिवाय प्रचाराच्या गाड्या, टेम्पो फिरल्या. तरूण, तडफदार, झुंझार अशी अनेक विशेषणे लावून अपक्षांसह राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार केला. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने एका मागे एक प्रचाराच्या गाड्या नगरात फिरत होत्या. उमेदवारही प्रभागात फिरत असल्याचे दिसून आले. आज सायंकाळी मोहाडीतील कोलाहल शांत झाला. बॅनर उतरले. अन् सुरू झाली कत्तलच्या रात्रीची योजना. सर्व उमेदवारांनी प्रचाराच्या दिवसात आपली क्षमता ओळखून घेतली. निवडूण येण्याचा अंदाजही बांधला. याच अंदाजावर रात्रीची योजना सुरू झाली. ३१ आॅक्टोबरची म्हणजे मतदानाच्या दिवशीची आदली रात्र उमेदवारांना बैचेन करून सोडणारी असते. कोणत्याही क्षणी उमेदवार, उमेदवारांचा दूत येईल याची नेम नाही म्हणून मतदारही एककान सुरू ठेवतात. याचेही घ्यायचे, त्याचेही घ्यायचे असा रिवाज मतदारांनी पाडला आहे. धन संपत्तीच्या बळावर मतदान आज स्थितीत खरेदी केल्या जातो. तथापि, निर्णायक मतदान करणारे कमी असतात. कोणी माहौल वर मतदान करणारे, कुणी समाजाचा आहे म्हणून, तर कुणी अर्थकारणाला विकणारे मतदान करतात. काही काळासाठी मतदार पक्षही विसरतात. नेते स्वार्थासाठी पक्ष विसरू शकतात तर हा मतदार राजा आहे. कत्तल की रात मानली जाणारी ही रात्र उमेदवारांची शक्ती परीक्षा बघणारी असते. मोहाडीत कोणाची सत्ता बसणार याची अंदाज मतदारांनी आधीच बांधला आहे. पण, एका रात्रीत वातावरण पलटवणारी शक्ती मोठ्या संख्येने उमेदवार वापरणार असल्याने कोणाच्या पक्षाचा आलेख उतार चढाव होईल याचा अंदाज प्रत्यक्ष रूपाने मतमोजणीच्या दिवशीच दिसून येईल.लाखनी : लाखनी नगरपंचायत निवडणुकीत ७३ उमेदवारांच्या प्रचारतोफा आज सायंकाळी थंडावल्या. दिवसभर पदयात्रा, रॅली, घोषणा यामुळे लाखनी शहर दुमदुमले. राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपाच नेते लाखनी शहरात दिवसभर फिरले आज सकाळी ९ वाजता सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी प्रभाग १६, १७ मध्ये पदयात्रा केली. आ. बाळा काशिवार यांनी प्रत्येक प्रभागातील गल्लीत जावून मतदारांशी संपर्क केला.काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिरलोरकर यांनी प्रत्येक वॉर्डात जावून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. विकास गभणे, अशोक चोले यांनी रॅली काढून मतदान करण्याचे आवाहन केले. नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. १७ प्रभागात १७ मतदान केंद्रासाठी २० पथक तयार झाली आहेत. लाखनी शहरात १०२९४ मतदार मतदान करणार आहेत. त्यात पुरूष मतदार ५१३१ व स्त्री मतदार ५१६३ आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपले कौशल्य पणाला लावले आहे. आज व उद्याची रात्र उमेदवारासाठी वैऱ्याची आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांना खुश करित आहे. एका उमेदवाराने मतदारांकडे तेलाचे पिपे पाठविले एका उमेदवाराने महिलांना खड्यांचे वाटप केल्याची चर्चा आहे. महिला मतदारांना खुष करण्यासाठी साड्या वाटण्यात आल्याची चर्चा आहे. काही उमेदवारांनी कोजागिरी साजरी करून मतदारांना दुध केवळ वाटले. पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर असून प्रति हेक्टर हजाराच्यावर रेट सुरू असल्याची चर्चा आहे. मतदार राजाला विकत कसे घेता येईल व आपल्याला खुर्ची कशी मिळेल, याकडे उमेदवारांचे लक्ष आहे.लाखांदूर : नगर पंचायतीच्या निवडणुकीचा प्रचाराचा अंतिम टप्प्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगरपंचायत क्षेत्रात रॅली काढण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उम्मीदवारांनी मतदारांसी थेट संपर्क साधून आशिर्वाद घेतला. अन्य राजकीय पक्षांनीही असाच प्रकार केला.बँक आॅफ इंडिया शाखेच्या समोरून दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँगे्रसने रॅली काढण्यात आली. रॅली जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगर, अविनाश ब्राम्हणकर, बाळु चुन्ने, अ‍ॅड. मोहन राऊत, प्रियंक बोरकर, नरेश दिवढे, डॉ. भारती, निलेश बघमारे, देवानंद नागदेवे, रवि धोटे, शैलेश चौव्हाण, चक्रधर तोंडरे यांचे नेतृत्वात काढण्यात आली. उम्मीदवारांनी घरो घरी जावून मतदारांसी संवाद साधून आशिर्वाद प्राप्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लाखनी, मोहाडी व लाखांदूर या तीनही नगर पंचायतीच्या सर्व प्रभागात निवडणुक लढवीत आहे. उम्मीदवारांनी दारा दारावर पोहचुण मतदारांचा आशिर्वाद ही घेतला. या रॅलीला ही मतदारांनी स्वयंउत्सफुर्त पणे प्रतिसाद दिला. (तालुका प्रतिनिधी)