लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : वरुणराजाच्या आशीर्वादाने सर्वत्र पर्ज्यण्यवृष्टी होत आहे. शेतात रोवणीची कामे जोमात सुरू आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात रोवणी सुरू केल्याने त्यांच्या घराचे दार बंद दिसत असून गावात शुकशुकाट दिसत आहे. शेतीच्या कामाला सहपरिवार शेतकरी लागला असून शेतशिवारात काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांसह अबालवृद्ध रोवणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. एकीकडे गावात दिवसभर शांत वातावरण तर दुसरीकडे शेतात काम आणि मनोरंजन दोन्ही सोबत चालत आहेत. शेतशिवारात बघितल्यास कुठे ट्रॅक्टरचा आवाज, कुठे नागर हाकणारा बैलाच्या मागे चालत आहे तर कुणी पाळ कोरपते तर कुणी पऱ्हे खोदत आहे.यात प्रमुख शेतकरी नागरणी आणि चिखलणीच्या कामात, मुलगा कुदळ घेऊन बांधीचे खोपरे खोदतांना तर म्हतारे वडील पºहे खोदतांना दिसत आहेत.काही मोठे शेतकरी ट्रॅक्टरने चिखलणी करतांना किंवा करवुन घेताना दिसत आहेत. सकाळी ६ वाजेपासून तर सायंकाळी ७ वाजतापर्यंत चिखलणीच्या कामाची लगबग सुरु असून रोवणाºया महिला शेतात हजर होईपर्यंत चिखल तयार झाला पाहिजे याची एक लगबग शेतात दिसून येत आहे.सकाळपासून चिखलाच्या कामात व्यस्त असलेल्या लोकांना जेवायला देते. यावेळी शेतात भरपोट जेवन करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जेवन झाल्यावर थोडा वेळ विसावा नंतर लगेच पुन्हा कामाला सुरवात होते. पेंढ्या चिखलात टाकणे आणि उर्वरित चिखलणीची पुन्हा तयारी करणे. दुसरीकडे महिला मोठ्या उत्साहाने आपली उर्जा वापरत भात रोवणी करु लागत आहेत. चिखलात रोपे लावून रोवणी करणे महिलाचे नित्यक्रम बनले आहे. दिवसभर चिखलात थकून परिश्रम करुनही दुसºया दिवशी सकाळी जागे होवून पुन्हा शेतीच्या कामासाठी तयार राहणे हा क्रम सुरुच राहतो.रोवणीच्या काळात एकीकडे शेतात सर्वत्र काम सुरु असते. चार महिन्यानंतर येणाºया सोनेरी पिकासाठी आणि सुखाची दिवाळी साजरी करण्यासाठी मोठ्या अपेक्षेने बळीराजा सहकुटूंब शेतात मेहनत करीत असतो. याचे प्रत्यक्ष दर्शन प्रत्येकच शेतशिवारात होत आहे.
पावसामुळे रोवणीला जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:48 IST
वरुणराजाच्या आशीर्वादाने सर्वत्र पर्ज्यण्यवृष्टी होत आहे. शेतात रोवणीची कामे जोमात सुरू आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात रोवणी सुरू केल्याने त्यांच्या घराचे दार बंद दिसत असून गावात शुकशुकाट दिसत आहे.
पावसामुळे रोवणीला जोर
ठळक मुद्देशेतकरी व्यस्त : तरीही ‘कही खुशी, कही गम’