शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

फेकलेली औषधे पशूंची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:16 IST

तुमसर-रामटेक मार्गावरील खापा शिवारात रस्त्याशेजारील फेकलेली हजारो रुपयांची औषधी पशूंची असल्याची बाब उघडकीस आली आहे.

पशूसंवर्धन विभाग जागा : औषधांचा पंचनामा, पशू रुग्णालयाचा रेकॉर्ड मागितलामोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर-रामटेक मार्गावरील खापा शिवारात रस्त्याशेजारील फेकलेली हजारो रुपयांची औषधी पशूंची असल्याची बाब उघडकीस आली आहे. सोमवारी लोकमतमध्ये ‘रस्त्याशेजारी फेकली हजारो रुपयांची औषधी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यावर पशूसंवर्धन तथा आरोग्य विभाग खळबळून जागे झाले. फेकलेली औषधे पशंूची असल्याचे माहिती समोर आली आहे. सोमवारी पशूसंवर्धन व सामान्य आरोगय विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देवून पाहणी केलीतुमसर- रामटेक राज्य मार्गावरील खापा (तु) शिवारात शासकीय पुरवठ्याची पशूंची औषधे फेकली आहेत. सोमवारी तुमसर पंचायत समितीअंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. ए. कुरैशी यांनी भेट दिली. त्यांनी चौकशी व तपासणी केल्यावर फेकलेली औषधे पशंूची असल्याचे सांगितले. पशूसंवर्धन विभागाला शासनाकडून दरवर्षी औषधांचा पुरवठा केला जातो. पशूंना ही औषधे निश्चितच दिली जातात. तुमसर शहर व तालुक्यात पशु रुग्णालये राज्य शासन व जिल्हा परिषदेमार्फत सुरु आहेत. फेकलेली पशूंची औषधे पशूंना देण्यात आली नाही, असे दिसून येते.फेकलेली औषधी काही कालबाह्य झाली असून काही औषधी कालबाह्य झालेली नाही असे समजते. संबंधित औषधी कुणाची आहेत. (रुग्णालयाची) याची माहिती अद्याप कळू शकली नाही. औषधाचा साठ्यावरुन नेमकी माहिती येथे कळू शकेल. औषधाच्या बॅच क्रमांकावरुन नेमकी औषधे कोणत्या पशू रुग्णालयाची आहेत याची माहिती प्राप्त करता येते. सोमवारी तुमसर येथील पशु संबंधीत आरोग्य उप सहसंचालक डॉ. विवेक इटनकर यांनी भेट देऊन औषधांचा पंचनामा केला. तालुका पशु संवर्धन अधिकारी डॉ. भास्कर चोपकर यांनीही भेट देऊन पाहणी केली.तुमसर तालुक्यात राज्य शासन व जिल्हा परिषदेचे १२ ते १३ पशु रुग्णालये आहेत. खापा शिवार मोहाडी तालुक्याच्या सीमेवर असल्याने ही औषधी नेमकी कोणत्या पशू रुग्णालयाची आहे. त्याचा शोध घेण्याची गरज आहे. औषधांवर नॉट फॉर सेल, फॉर गव्हर्नमेंट सप्लाय. असे नमूद असल्याने घडलेला प्रकार फार गंभीर आहे. सर्व सामान्यांच्या पशूंकरिता शासन कोट्यावधीची औषधी पाठविते व त्यांची विल्हेवाट फेकण्याने करण्यात येते ही गंभीर तितकाच संतापजनक प्रकार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे.खापा शिवारात फेकलेली पशूंची औषधींचे निरीक्षण करुन पाहणी केली. नेमकी ही औषधी कुणाची आहे याची चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर सविस्तर सांगता येईल.डॉ. विवेक ईटनकर, प्रभारी उपसहसंचालक राज्य पशूसंवर्धन विभाग, तुमसरखापा शिवारातील फेकलेली औषधांचे बॅचेस जिल्हा परिषदेच्या पशू रुग्णालयातील साठा एका वर्षापूर्वीच संपला आहे. तुमसर तालुक्यातील सर्वच पशूसंवर्धन रुग्णालयातील रेकॉर्ड तपासणीकरिता बोलविला आहे. नेमके कुठले औषध आहे ते त्यातून कळेलडॉ. भास्कर चोपकर, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, पंचायत समिती तुमसर