शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रेतीच्या टिप्परचा पवनीत थरार, दुचाकीला उडवून ट्रॅक्टरला धडक; तीन दुचाकींचा चुराडा

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: March 12, 2024 16:23 IST

तीघे जखमी; अपघातग्रस्त ट्रॅक्टर शिरले चहाच्या दुकानात

भंडारा : पवनी शहरात मंगळवारी सकाळी रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने अक्षरश: थरार केला. एका दुचाकीस्वाराला धडक देऊन पळ काढला. पुढे एका ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघातग्रस्त ट्रॅक्टर तीन दुचाकींचा चुराडा करीत थेट चहाच्या दुकानात शिरला. दुचाकीचालकाच्या पायाचे हाड मोडले तर चहा दुकानदारासह दोघे जखमी झाले. सकाळी ८:१० वाजताच्या सुमारास हा थरार घडला.

पवनी-निलज महामार्गावर हा अपघाताचा थरार अनुभवास आला. रेती रिकामी करून पुन्हा दुसऱ्या खेपेसाठी भिवापूरकडून पवनीकडे वेगात येणाऱ्या टिप्परने (क्रमांक एमएच २७ एक्स ७६१०) नागपूर सावजी भोजनालायसमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. समोरासमोर बसलेल्या या धडकेमुळे चालकासह दुचाकी अक्षरश: हवेत उडून रस्त्याच्या विरुध्द दिशेला जावून पडली. यात दुचाकीस्वाराच्या पायाचे हाड मोडून गंभीर दुखापत झाली. जखमी दुचाकी चालकाचे नाव लोमेश्वर श्रीराम ठाकरे (५०, भिवापूर) असून दुचाकी क्रमांक एमएच ४० बीएच ४२६२ असा आहे.

पळ काढताना दुसरा अपघातया अपघातानंतर टिप्परचालकाने पळ काढला. वेगात पुढे जात असताना पुन्हा पवनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुसरा अपघात केला. मधू कुर्झेकर यांच्या चहाच्या दुकानापुढे बेलघाटा वॉर्डातून येणाऱ्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. यात ट्रॅक्टरचे पुढील चाकच तुटून पडले. या ट्रॅक्टरमुळे पुन्हा दोन अपघात घडले. पोलिसांनी टिप्परचालक पवन नेवारे (२५) याला टिप्परसह ताब्यात घेतले असून दुचाकीचालक जखमी लोमेश्वर ठाकरे याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तीन दुचाकींचा चुराडाटिप्परच्या धडकेमुळे चाक तुटल्याने अनियंत्रित झालेला ट्रॅक्टर थेट तीन दुचाकींचा धडक देत चहाच्या दुकानात शिरला. यात एमएच ३६ एएच ३०९२, एमएच ३४ एएल १०६८ आणि एमएच ३६ एके ५२२२ या तीन दुचाकींचा अक्षरश: चुराडा झाला. एवढेच नाही तर, चहा दुकानदार मधुकर (६०) आणि दुकानात चहा घेत असलेला ग्राहक रमेश उराडे (५०) हे दोघेही किरकोळ जखमी झाले.अवैध रेती तस्करी कारणीभूततालुक्यात रेतीचोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. रोज शंभरावर टिप्पर रेतीची चोरटी वाहतूक करतात. ही तस्करी निरपराध नागिरकांच्या जीवावर उठत असल्याने आता महसूल विभागातील अधिकारी आणि पोलिसांविरूद्ध संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात