शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

आरोपींना तीन वर्षांचा कारावास

By admin | Updated: December 4, 2015 00:49 IST

एका व्यावसायिकाला धमकी देऊन खंडणी वसुल केल्याप्रकरणी तुमसरातील तीन सराईत आरोपींना प्रत्येकी तीन वर्षाचा कठोर कारावास आणि नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

तुमसर न्यायालयाचा निर्णय : खंडणी तथा धमकावल्याचे प्रकरणतुमसर : एका व्यावसायिकाला धमकी देऊन खंडणी वसुल केल्याप्रकरणी तुमसरातील तीन सराईत आरोपींना प्रत्येकी तीन वर्षाचा कठोर कारावास आणि नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी व्ही. के. उमाळे यांनी हा निकाल दिला.तुमसर पोलीस ठाण्यातंर्गत एप्रिल २०१४ मध्ये गंज बाजार परिसरात आशिष निखाडे रा.तुमसर यांच्या आॅनलाईन लॉटरी दुकानात आरोपी संतोष ऊर्फ गोलु सुभाष गभने आणि धीरज ऊर्फ शेरु वसंता पडोळे रा. माकडे वॉर्ड तुमसर आले. आरोपी संतोषने आशिष निखाडे यांना चाकुचा धाक दाखवून एक हजाराची मागणी केली. आशिषने मी दुकान आताच सुरु केल्यामुळे पैसे नाहीत असे सांगितले. तेव्हा आरोपी संतोषने मी पुन्हा सहा तारखेला येईन तेव्हा मला पाच हजार देशील नाही तर ‘तेरा काम कर दुंगा’ असे धमकावून आरोपी निघून गेले. त्यापूर्वीही या आरोपींनी आशिषला अनेकदा धमकावून खंडणी वसुल केली होती.३ एप्रिल २०१४ ला तोंडी तक्रारीवरुन आरोपीविरुध्द भादंवि ३८४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात विरेंद्र ऊर्फ विरु रमेश फुले (३४) रा.दत्तात्रय नगर तुमसर, संतोष गभणे (२४), धीरज पडोळे (३२) रा.माकडे वॉर्ड तुमसर यांना अटक करण्यात आली. सबळ पुराव्यानंतर त्यांच्याविरुध्द भादंवि ३८४, ३८६, ३८७, ३४ सहकलम २०१ अन्वये तुमसर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. या तिन्ही आरोपीविरूद्ध प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी व्ही. के. उमाळे यांच्या न्यायालयाने तिन्ही आरोपींना प्रत्येकी तीन वर्षाचा कठोर कारावास आणि प्रत्येकी नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, खुन, खूनाचा प्रयत्न गैरकायद्याची मंडळी, दुखापत, गंभीर दुखापत, भारतीय हत्यार कायदा अन्वये अपराध, मारामारी, अश्लिल शिवीगाळ, धमकदी देणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.या खटल्याचे काम सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. मनिषा राऊत यांनी पाहिले. गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे आणि पोलीस निरीक्षक किशोर गवई यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एम. जाधव तथा सहकाऱ्यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)