शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत तिरंगी-चाैरंगी लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या ५२ गटांची निवडणूक घाेषित झाली. मात्र, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याने १३ गटांतील निवडणुकीला स्थगिती मिळाली. आता ३९ गटांतील निवडणूक हाेत आहे. मंगळवारपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. परंतु सर्वाेच्च न्यायालयात काय निकाल लागताे याकडे लक्ष लागले हाेते. अखेर बुधवारी निवडणूका हाेणार हे निश्चित झाले आणि सर्वच उमेदवार प्रचाराला लागले आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनिश्चिततेच्या सावटात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने बुधवारपासून प्रारंभ झाला असून, जिल्ह्यातील ३९ गटांमध्ये सध्यातरी तिरंगी-चाैरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी अपक्षांचा जाेर दिसत असून यामुळे पक्षाच्या उमेदवारांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असली तरी निवडणूका पुढे जाणार तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित हाेत आहे.जिल्हा परिषदेच्या ५२ गटांची निवडणूक घाेषित झाली. मात्र, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याने १३ गटांतील निवडणुकीला स्थगिती मिळाली. आता ३९ गटांतील निवडणूक हाेत आहे. मंगळवारपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. परंतु सर्वाेच्च न्यायालयात काय निकाल लागताे याकडे लक्ष लागले हाेते. अखेर बुधवारी निवडणूका हाेणार हे निश्चित झाले आणि सर्वच उमेदवार प्रचाराला लागले आहेत. भंडारा तालुक्यातील नऊ गटांत निवडणूक होत असून गणेशपूर, खोकरल, धारगाव, आमगाव, ठाणा याठिकाणी चौरंगी तर इतर ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. सर्वांचे लक्ष गणेशपूरच्या निवडणुकीकडे लागले आहे. तुमसर तालुक्यातील चिखला व आंबागड येथे चाैरंगी तर आष्टी बपेरा येरली खापा, देव्हाडी येथे तिरंगी लढत हाेत आहे. माेहाडी तालुक्यातील चारही गटामध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे. आंधळगाव पाचगांव, बेटाळा आणि करडी येथे रणधुमाळी सुरू आहे. बेटाळा क्षेत्रात अपक्षाने जाेर वाढविला आहे. साकाेली तालुक्यातील सहा गटांत निवडणूक हाेत असून पिंडकेपार, कुंभली, परसाेडी, वडद येथे चाैरंगी तर किन्ही, सानगडी गटात तिरंगी लढत हाेत आहे. वडद, कुंभली आणि पिंडकेपार येथे माेठ्या प्रमाणात अपक्ष रिंगणात आहेत.लाखनी तालुक्यातील केवळ दाेन गटांत निवडणूक हाेत असल्याने येथे उत्साह दिसत नाही. पाेहरा आणि लाखांदूर येथे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. परंतु पुढे जाण्याची प्रतीक्षा सुरू आहे. पवनी तालुक्यातील अड्याळ पिंपळगाव, काेंढा, आसगाव आणि सावरला येथे तिरंगी लढतीची शक्यता असून कुठेही सरळ लढत हाेणार नाही. लाखांदूर तालुक्यात मासळ, दिघाेरी, भागडी, सरांडी, माेहरणा, पिंपळगाव येथे निवडणूक हाेत असून सर्वच ठिकाणी तिहेरी लढतीची शक्यता आहे. विविध पक्षात बंडखाेरी झाली असून, १२ अपक्ष उमेदवार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे गणित बिघडवू शकते.

प्रचाराला सुरुवात, अन् उमेदवारांची घालमेल- ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर निवडणूक हाेणार की नाही याबाबतची अनिश्चितता गुरुवारी सायंकाळपर्यंत कायम हाेती. राज्य मंत्रीमंडळात निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु दिवसभरात राज्य निवडणूक आयाेगाकडून काेणताही आदेश काढण्यात आला नाही. उमेदवारांनी दिवसभर प्रचार केला. परंतु निवडणूक स्थगित तर हाेणार नाही ना? अशी शंकाही त्यांना सतावत हाेती. प्रत्येकजण निवडणूक आयाेगाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून हाेते. दाेन दिवसांपासून प्रचाराला सुरुवात झाली असली तरी उमेदवार प्रचार करताना सावध पवित्रा घेत असल्याचे दिसत आहे. ऐनवेळी निवडणूक रद्द झाली तर आपल्याला आर्थिक फटका बसू नये अशी त्यांची भूमिका आहे. एकीकडे प्रचारतर करावा लागत आहे. परंतु निवडणूक रद्द झाली तर काय अशी अनिश्चितताही सतावत आहे.

ओबीसींच्या भूमिकेकडे उमेदवारांचे लक्ष- निवडणूक झाली आणि आपल्या गटातील ओबीसी समाजाने निवडणूकीवर बहिष्कार टाकला तर काय? अशी शंकाही उमेदवारांना सतावत आहे. ओबीसी संघटनानी आरक्षण नाही तर मतदान नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे उमेदवार संभ्रमात सापडले आहे. भंडारा जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात ओबीसी समाज असून निवडणूकीत भाग घेतला नाही तर माेठा प्रभाव या निवडणूकीवर पडू शकताे. त्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद