शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात रेतीच्या तीन कारवाया, ५२.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:39 IST

Bhandara : ५३ हजारांच्या रेतीसह तीन ट्रॅक्टर आणि एक टिप्पर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गेल्या २४ तासात जिल्हा पोलिसांनी तीन ठिकाणी रेती तस्करांविरुद्ध कारवाई केली. यात ५३ हजारांच्या रेतीसह वाहने मिळून ५२ लाख ५४ हजार रुपयांचा माल जप्त केला. या जप्तीमध्ये तीन ट्रॅक्टर आणि एका टिप्परचा समावेश आहे.

कारधा पोलिस स्टेशन अंतर्गत झालेल्या कारवाईत १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. १७ जूनला रात्री २:२० वाजताच्या सुमारास खमारी नाला येथे पोलिस हवालादार दिलीप धावडे पेट्रोलींग करीत असता ट्रॅक्टर एमएच ३६/एजी ०८६७ आणि बिना नंबरची निळ्या रंगाची ट्रॉली जप्त केली. (चालक-मालक खिलोन राजु शेन्डे, खमारी), तसेच, ट्रॅक्टर एमएच ३६ / झेड ८७९५ आणि संलग्नित ट्रॉली (चालक मालक निलेश शंकर पवनकर, खमारी) यांच्या ताब्यातील दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉलीतून प्रत्येकी एक ब्रॉस रेती (किंमत १२ हजार रुपये) तसेच, दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉली (किंमत १२ लाख) असा १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दुसरी कारवाई तुमसर पोलिसांच्या हद्दीत झाली. या कारवाईत ५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. ६:१५ वाजताच्या सुमारास, गोबरवाहीचे पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती गिते पेट्रोलींग करीत असताना बाजार चौक आलेसुर येथे चालक मालक कैलास किसन गराट (लेंडेझरी) याच्या ताब्यातील ट्रॅक्टरएमएच ३६ / एएल ८७४२ आणि जोडलेली विना क्रमांकाची ट्रॉली रेतीची चोरटी वाहतुक करताना जप्त केली. ट्रॅक्टर व ट्रालीची किंमत ५ लाख रुपये आणि एक ब्रास रेती असा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंदविला. तिसरी कारवाई वरठी पोलिस स्टेशन अंतर्गत झाली. एकलारी येथे पेट्रोलींग करताना टिप्पर एमएच ४० / सीटी ९२३८ जप्त केला. चालक संजयकुमार अतकरी, भांडेवाडी नागपूर, आकाश धुर्वे (भामेवाडा ता. कुही) मालक स्वप्नील भोंदले (पाचगाव, नागपूर) यांच्यावइरुद्ध गुन्हा नोंदविला. यात ६ ब्रॉस रेती अणि ३५ लाखांचा टिप्पर असा ३५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तिन्ही गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनात कारवाया करण्यात आल्या. 

आलेसुर येथे अवैध रेती तस्करीवर छापागोबरवाही : तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. १७जूनला सायंकाळी सहा वाजता आलेसूर येथील बाजार चौकात पेट्रोलिंग दरम्यान ट्रॅक्टरद्वारे रेतीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत ट्रॅक्टर (एमएच ३६ /एएल ८७४२) आणि टॉलीसह सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कैलास गराट, (लेंडेझरी) यांच्याकडे रेती वाहतुकीसाठी कोणतेही वैध परवाने किंवा कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ७ व ९ तसेच मोटर वाहन अधिनियम ५०/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा