शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना एक्स्प्रेस रेल्वेत लूटमार करणारे तीन लुटारू जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 23:34 IST

१२ नोव्हेंबर रोजी  तुमसर ते तिरोडा दरम्यान धावत्या गोंडवाना एक्स्प्रेसच्या पेंट्री कारमध्ये तीन लुटारूंनी प्रवेश केला. पेट्री कारमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्या  जवळून ७० हजारांची लूटमार करून पसार झाले. या घटनेची माहिती गोंदिया रेल्वे पोलिसांना देण्यात आली. त्या अनुषंगाने रेल्वे पोलिसअंतर्गत कलम ३९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर  : धावत्या गोंडवाना एक्स्प्रेसच्या पेंट्री कारमध्ये शिरून लूटमार करणाऱ्या तीन लुटारूंना रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले. लुटमारीची ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड ते तिरोडा या रेल्वे स्थानकादरम्यान १२ नोव्हेंबर रोजी घडली होती. लुटारुंनी चेन पुलिंग करून रेल्वे थांबविली आणि पसार झाले होते.अरविंद सुजन सिकरवार (२४), रा. गलैथा जि. मुरैना, मोहन शंकरसिंह तोमर (२१) रा. पोरस जि. मुरैना, रवीसिंहग महावीर सिंग (२५) रा. फुलावली जि. भिंड अशी अटकेतील लुटारूंची नावे आहेत.  १२ नोव्हेंबर रोजी  तुमसर ते तिरोडा दरम्यान धावत्या गोंडवाना एक्स्प्रेसच्या पेंट्री कारमध्ये तीन लुटारूंनी प्रवेश केला. पेट्री कारमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्या  जवळून ७० हजारांची लूटमार करून पसार झाले. या घटनेची माहिती गोंदिया रेल्वे पोलिसांना देण्यात आली. त्या अनुषंगाने रेल्वे पोलिसअंतर्गत कलम ३९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. लुटारूंना अटक करण्यासाठी नागपूरचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांच्या मार्गदर्शनात एक पथक तयार करण्यात आले. त्यांनी लुटारूंना मोठ्या शिताफीने सोमवारी नागपूर परिसरातून रात्री अटक केली.ही कारवाई निरीक्षक एस. दत्ता, निरीक्षक व्ही. के. तिवारी, उपनिरीक्षक मो. मुगीसुद्दीन, उपनिरीक्षक आर्. ए. बनसोड, आरक्षक जयंतीलाल, निरीक्षक अनिल पाटील, निरीक्षक नंदबहादुर गोंदिया यांच्या पथकाने केली. त्यांनी आणखी कुठे असे लुटमारीचे प्रकार केले काय, याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहे.

गाडीची चेन ओढून लुटारू झाले पसार- तीन लुटारूंनी पेन्ट्री कारमध्ये लुटमार केल्यानंतर पळून जाण्यासाठी चेन पुलिंग केले. तुमसर तालुक्यातील माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलाजवळ रेल्वे थांबताच तिनही लुटारू पसार झाले. धावत्या रेल्वेत लुटमार करण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच घटना असावी.

 

टॅग्स :Robberyचोरी