शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

भंडारा जिल्ह्यात महाप्रसादातून ३०० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 2:16 PM

भंडारा जिल्ह्यात भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात गावभोजनासाठी गेलेल्या तब्बल ३०० जणांना महाप्रसादातून विषबाधा झाल्याची घटना लाखांदूर तालुक्याच्या रोहणी येथे रविवारी घडली.

ठळक मुद्देदूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याचा संशयलाखांदूर तालुक्याच्या रोहणी येथील येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात गावभोजनासाठी गेलेल्या तब्बल ३०० जणांना महाप्रसादातून विषबाधा झाल्याची घटना लाखांदूर तालुक्याच्या रोहणी येथे रविवारी घडली. पोटदुखी, जुलाब व उलटीचा त्रास झाल्याने बाधितांना कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर अतीबाधितांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.रोहणी गावात मागील ३१ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान रविवारी गोपालकाल्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर या कार्यक्रमाच्या समारोपाला आलेल्या परिसरातील हजारो नागरिकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. रात्री शेकडो विद्यार्थी महिला व नागरिकांना पोटदुखी, जुलाब व उलटीचा त्रास जाणवू लागल्याने सबंधितांनी कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली.यावेळी कुडेगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाधित रुग्णांची विचारपुस करुन औषधोपचार करीत आरोग्य विभागाकडे तात्काळ वैद्यकिय चमू हजर करण्याची मागणी केली. या घटनेतील काही अतिबाधित रुग्णांना लाखांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन बाधितांवर औषधोपचार चालू आहे.

टॅग्स :Healthआरोग्य