शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यात ५६ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: November 14, 2016 00:35 IST

गोंदिया,भंडारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक मोहिम सुरु झाली असून ...

भंडारा : गोंदिया,भंडारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक मोहिम सुरु झाली असून सप्टेंबर ते नोव्हेंबर या तिन महिन्यात तब्बल ५६ लाचखोर एसबीच्या जाळयात अडकल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.भ्रष्टाचार हा कधीही बरा न होणारा रोग आहे असे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु म्हणून गेले. आज त्याचे प्रत्यंतर ६७ वर्षानंतरही दिसत आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागही या लढाईत योगदान आहे. नागरिकांचे सहकार्य आणि एसबी विभागाचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे महाराष्ट्रभर लाचखोरांवरील कारवाईत वाढ झाली आहे. हे राज्यातील लाचखोरांच्या फुगलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात ११, आॅक्टोबर ५४ आणि ८ नोव्हेंबरपर्यंत १ अशी १५ लाचखोरांची संख्या आहे. जानेवारी २०१६ व आॅगस्ट २०१६ पर्यंत दोन्ही जिल्ह्यांचे पथक मिळून १८ प्रकरणात ३८ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली होती तर ३ संयुक्त कारवाईत ३ लाचखोर आरोपींचा समावेश होता. म्हणजे एवूष्ठण ३१ प्रकरणात ४१ लाचखोर गजाआड झाले आहेत. गतवर्षी या लाचखोरांच्या आकडेवारीचे सिंहावलोकन केले तर लाचखोरांमध्ये महसूल विभाग प्रथम तर पोलीस विभाग क्रमांक २ वर होता आणि त्यापाठोपाठ इतर विभागांचा समावेश होता. मात्र २०१६ या वर्षात अनेक विभागाचे आकडे बदलतांना बघितले जाते. ज्या विभागातून देशात आधारस्तंभ घडविला आहे त्या शिक्षण क्षेत्राने जिल्ह्यात लाचखोरीत अग्रक्रमांक प्राप्त केला. जानेवारी ते ८ नोव्हेंबरपर्यंत शिक्षण विभागातील तब्ल १३ लाचखोर कमर्चारी एसबीच्या जाळयात अडकले. यात शिक्षणाधिकारी १, शिक्षक ३ व इतर शाळा संबंधित ३ जणांचा समावेश आहे.१ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान भंडारा एसबी पथकाने ४ प्रकरणात सहा लाचखोरांना गजाआड केले. गोंदिया पथकाने याच दरम्यान याच प्रकरणात ४ लाचखोरांना अटक केली. याचदरम्यान तिन संयुक्त कारवाईत ५ लाचखोर गवसले. या संयुक्त कारवाईत भंडारा - नागपूर, गोंदिया -चंद्रपूर आणि भंडारा - गडचिरोली या संयुक्तीक पथकांचा समावेश आहे. एकूणच भंडारा - गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जिल्हानिहाय आकडेवारी समोर आणली तर ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत एवूष्ठण १८ प्रकरणात २८ लाचखोर भंडारा पथकाला गवसले. गोंदिया पथकाला १८ प्रकरणात १० लाचखोर तर संयुक्त कारवाईत ६ प्रकरणात ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत १८ प्रकरणात १० लाचखोर गवसले तर संयुक्त कारवाईत सहा प्रकरणात आठ लाचखोरांना अटक करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)