शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांकडून मुख्यमंत्री सडक योजनेचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:35 IST

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१६-१७ संशोधन व विकास कार्यक्रम अंतर्गत आमदार बाळा काशिवार यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजुर झाले असून या रस्त्यांचे काम वेगाने चालू आहे. माञ कंत्राटदारांकडून रस्ते बांधकामात घोळ केल्या जात आहे. कमी मटेरीयल वापरून, रुंदीकरणाच्या कामात घोळ होत आहे.

ठळक मुद्देकमी साहित्य वापरून निकृष्ट बांधकाम : दोन महिन्यापासून नागरिकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१६-१७ संशोधन व विकास कार्यक्रम अंतर्गत आमदार बाळा काशिवार यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजुर झाले असून या रस्त्यांचे काम वेगाने चालू आहे. माञ कंत्राटदारांकडून रस्ते बांधकामात घोळ केल्या जात आहे. कमी मटेरीयल वापरून, रुंदीकरणाच्या कामात घोळ होत आहे.तालुक्यातील पिंपळगाव/ को ते मडेघाट, कन्हाळगाव ते मेंढा/ चप्राड, रामा ३५४ ते सावरगाव, रामा ३५४ ते खैरी/पट, रामा ३५४ आसोला ते मांदेड, रामा ३५४ परसोडी/नाग ते कुडेगाव, रामा ३५४ ते रोहनी, दोनाड ते किरमटी, प्रजिमा ३९ घोडेझरी ते पालेपेंढरी, प्रजिमा ३८ सोनेगाव ते पेंढरी या रस्त्याचा समावेश आहे.यातील रामा ३५४ ते खैरी/पट व रामा ३५४ रुपये कुडेगाव या कामात मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. ह्या कामाच कंत्राट असलेल्या कंत्राटदाराने मागिल दोन महिण्यापासुन कामाला सुरवात केली असून, मंद गतीने काम केले जात आहे. यामुळे रहदारीच्या नागरीकांची डोकेदुखी वाढली आहे. या ठिकाणी खुपच कमी प्रमाणात मटेरीयल वापरला जात आहे. कामात वापरलेला मुरूम निकृष्ठ दर्जाचा आहे.रुंदीकरण व खोलीकरणातच घोळ होत असून पाच ते सहा इंचच खोलीकरण करुन अर्ध्या रस्त्याचे काम उरकुन टाकल्याने तसेच त्यामध्ये निकृष्ठ मुरूमाचा वापर केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबद माहिती दिली असता. काम दजेर्दार होईल ठेकेदाराला सांगतो असे बोलले होते. परंतु पुन्हा निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने रस्त्याच्या कामामध्ये तेरी भी चुप मेरी भी चुप असा पवित्रा बांधकाम विभागाने घेतल्याने काम दर्जेदार होणार का नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. आता संबंधित विभागाच्या अधिकाºयांना किंवा कंत्राटदार फोन केले असता. फोन उचलल्या जात नाही. रस्त्याचा विकास तर होत आहे परंतु दर्जेहीन व निकृष्ट कामाचा या रस्त्यावरुन दिसुन येत आहे. रस्त्यासाठी तिन कोटी रुपयांचा निधी आहे. यासंदर्भात अभियंता शुक्ला यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.पुलाचे काम देखील निकृष्टचडांबरीकरणाच्या कामासोबतच पुलाचे देखील काम चालु असून, या कामात देखील कमी सिमेंन्ट वापरून निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. आतमधिल काम कमी मटेरीयल वापरून मातीचा भरणा करून वरून सिमेंटचे प्लास्टर केले जात आहे.मुरूमाचे वाजवीपेक्षा अधिक खननपिपळगाव/को. मार्गावरील तलावातुन सद्या स्थितीत मुरूमाचे उत्खनन चालू असून, येथुन परीसरातील रस्त्यांच्या बांधकामासाठी ट्रॅक्टरद्वारे मुरूमाची वाहतूक केली जात आहे. होत असलेला मुरूम उत्खनन राजरोसपणे जेसीबीच्या साहाय्याने एकाच राँयल्टीवरून १० ते १५ ट्रॅक्टर मुरूमाची वाहतूक केली जात आहे. एवढेच नाही तर रॉयल्टीवर खोडतोड करून चोरटी वाहतूक होत असल्याने महसुल पाण्यात बुडत आहे.कामावरील मटेरीयल लोकांच्या घशातखैरी/पट येथे सुरू असलेल्या कामावरील सिमेंन्ट व गिट्टी गावातील एका व्यक्तीने चक्क स्वत:च्या घरी नेले असून, खुद्द ठेकेदारांनेच दिले असल्याचे सांगितले जाते आहे. या ठिकाणी साठ मिटर नाली बांधकाम होत असतांना ग्रामस्थांनी विस मिटर अधिक नाली बांधकाम करून मागितले असता, जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करण्यात आले. माञ साठच मिटर बांधकाम करून मटेरीयल संपल्याचे सांगण्यात आले आहे.होत असलेल्या रस्त्याचे काम खुपच निकृष्ट दजार्चे असून, संबंधित विभाग व ठेकेदाराकडून मनमानी केली जात आहे.- वामन नखाते,उपसरपंच ग्रा.पं.खैरी/पट