शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

१.४१ कोटी रुपयांच्या धान खरेदी अपहारात तीन केंद्रचालकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 13:38 IST

दोन वर्षांनंतर कारवाई : आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने केला तपास

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार चार वर्षांपूर्वी झालेल्या ५८ हजार ८९०.७६ क्विंटल धानाच्या अपहार प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या तीन केंद्रचालकांना अटक करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासानंतर आता विलंबाने का होईना, पण अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या केंद्रचालकांत सरांडी (बु) येथील नीलेश ठाकरे व पिंपळगाव (को) येथील दिनेश परशुरामकर आणि विनोद परशुरामकर या तीन केंद्रचालकांचा समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांना या अपहाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली. लेखापरीक्षण अहवालानुसार, चार वर्षांपूर्वी झालेल्या ५८ हजार ८९०.७६ क्विंटल धानाच्या खरेदीत अपहार झाल्याचे २०२१ मध्ये स्पष्ट झाले होते. त्यावरून विविध कलमाखाली चारही केंद्र चालकांविरुद्ध लाखांदूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात एकाने न्यायालयातून जामीन मिळविल्याने आता उर्वरित तीन केंद्रचालकांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रानुसार, लाखांदूर येथील दी सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थांतर्गत सन २०१९-२० या वर्षात खरीप व रब्बी अंतर्गत धान खरेदीसाठी एकूण चार खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले होते. या केंद्रात सरांडी (बु) येथील दोन व भागडीसह पिंपळगाव (को) येथील प्रत्येकी एका केंद्रांचा समावेश होता.

दरम्यान, सरांडी (बु) येथील एका खरेदी केंद्रांतर्गत सुमारे ५००२.७६ क्विंटल धानाची हेतुपुरस्पर नासाडी करण्यात आल्याचा ठपका अहवालातून ठेवण्यात आला होता, तर सरांडी (बु) येथीलच अन्य एक केंद्रांसह भागडी व पिंपळगाव येथील केंद्रांतर्गत सुमारे ८८८ क्विंटल धानाची तूट आढळून आल्याचे अहवालात म्हटले होते. विशेष म्हणजे लेखापरीक्षण अहवालातून या बाबी स्पष्ट झाल्यावर १ कोटी ४१ लाख रुपयांच्या एकूण ५८८०.७६ क्विंटल धानाचा अपहार झाल्याचा आरोप करून संबंधित केंद्र चालकांविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. तक्रारीवरून तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी चारही केंद्र चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला होता. त्यानुसार या विभागाचे पोलिस उपनिरीक्षक संजय सिंह ठाकूर, पोलिस हवालदार अशोक लुलेकर, आश्विन गोस्वामी व महिला पोलिस अंमलदार सुनीता मारबते आदी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोन वर्षांनंतर या केंद्रचालकांना अटक केली.

लेखापरीक्षकांनी केली होती तक्रारलाखांदूर येथील दि सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेअंतर्गत संबंधित केंद्रांच्या चाचणी लेखापरीक्षणाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार लेखापरीक्षणानुसार सदर केंद्रांतर्गत १ कोटी ४१ लाख रुपयांच्या धानाचा अपहार उघड झाला होता. या अपहारप्रकरणी जिल्हा लेखापरीक्षण अधिकारी व स्थानिक लाखांदूरचे सहायक निबंधक यांच्या निर्देशानुसार लेखापरीक्षक देवदास अन्नपूर्णे यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांत चार केंद्रचालकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा