शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:11 IST

गुप्त माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या घटनेत जवाहरनगर पोलिसांनी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर धाडी घालून तीन लक्ष २९ हजार ५६० किमतीचा दारुसाठा व साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : गुप्त माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या घटनेत जवाहरनगर पोलिसांनी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर धाडी घालून तीन लक्ष २९ हजार ५६० किमतीचा दारुसाठा व साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.जवाहरनगर पोलीस ठाणे सीमेलगत मोहफुलांच्या दारुचा अवैध व्यवसाय करीत असल्याच्या गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम व अपेक्षा मेश्राम, सहाय्यक फौजदार शेंडे, गस्तीवर असताना खैरी पांधी वैनगंगा नदी किनाºयावर मोहफुल दारुचा अवैध व्यवसाय करीत असताना रंगेहात पकडण्यात आले. यात एकुण ५२ हजार रुपये, ३ मोठे लोखंडी पिंप किंमत दोन हजार ४०० रुपये, पाच लोखंडी चौकोनी पिंप किंमत २५० रुपये, पाच हजार किलो जळावू लाकूड किंमत ५ हजार रुपये, एम.एच. ३६ वाय ५०२५ क्रमांकाची दुचाकी किंमत ४५ हजार रुपये व ६० लिटर हातभट्टी मोहफुलाची दारु किंमत चार हजार २०० रुपये असे एक लक्ष दहा हजार ५०० रुपये साहित्यांसह कमल बालाजी मेश्राम (२५) रा.शहापूर, गजानन सदाशिव मांढरे (२७) रा.शहापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती सदर दारुभट्टी ही विनोद खोब्रागडे रा.शहापूर यांच्या मालकीची असल्याचे सिद्ध झाले.दुसºया कारवाई शनिवारी सकाळी ७.३० वाजता सुमारास ठाणेदार यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार देवराम साखरे, मनोहर रामटेके, पोलीस नायक प्रमोद पढाल, पोलीस शिपाई अमोल सारोख, कुणाल कढव, सहाय्यक फौजदार चालक राजू थोटे यांच्या सहकार्यासोबत शंकर मारबते यांचे शेताजवळील ढोडी (नाला) शहापूर येथे दारु काढताना पकडले. यात सहा लिटर दारु, ४० किलो सडवा मोहा किंमत ४३ हजार दोनशे रुपये, एक पांढºया रंगाची एम.एच. ३६ - वाय ९२६९ क्रमांकानी दुचाकीसह रविंद्र बांडेबुचे (६५) व हेमराज नागदेवे (३२) दोन्ही राहणार गोपीवाडा यास ताब्यात घेण्यात आले. दुसºया ठिकाणी राहत्या घरी अरुण सेलोकर (३०) राहणार शहापूर या ठिकाणाहून मोहफुलाच्या दारुने भरलेले १४ ट्युब प्रत्येकी ४२ लिटर अशी ५८८ लिटर दारु किंमत २९ हजार ४०० रुपये व ५० लिटर हातभट्टी दारुने भरलेला ड्रम जप्त करण्यात आला.यात तीन लक्ष २९ हजार ५६० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. सदर दारु साठा वैनगंगा नदीत व शहापूर येथील दारूसाठा पोलीस स्टेशनच्या आवारात नष्ट करण्यात आला. सदर दोन्ही घटनेच्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.