शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

काेराेनात शिवभोजन थाळीने हजारो लोकांचे पोट भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सुरुवातीला १३ शिवभोजन केंद्रे होती. मात्र, आता नागरिकांचा वाढत असलेला प्रतिसाद पाहून राज्य शासनाने या केंद्रांची संख्या वाढविल्याने आता जिल्ह्यात एकूण ३८  केंद्रांमार्फत मोफत शिवभोजन दिले जात आहे. १४ एप्रिल ते १५ जुलैपर्यंत मोफत शिवभोजन थाळीचा लाभ मिळणार आहे. संचारबंदीतही आधार ठरल्याने या योजनेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. राज्यस्तरावरून अनुदानाचा विलंब झाल्यास केंद्र चालकांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागते.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३८ कार्यरत केंद्रे : १४ जुलैपर्यंत मिळणार मोफत थाळी

संतोष जाधवर लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  गोरगरिबांना वेळेत अन्न मिळावे, त्यांची उपासमार थांबावी यासाठी महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळीची योजना सुरू केली. या शिवभोजन थाळीचा अनेक गरजूंना आधार होत असून, कामानिमित्ताने बाहेरगावी आलेल्यांनाही पोटभर जेवण मिळत असल्याने योजना सर्वसामान्यांसाठी आधार ठरली आहे. जिल्ह्यात सुरुवातीला १३ शिवभोजन केंद्रे होती. मात्र, आता नागरिकांचा वाढत असलेला प्रतिसाद पाहून राज्य शासनाने या केंद्रांची संख्या वाढविल्याने आता जिल्ह्यात एकूण ३८  केंद्रांमार्फत मोफत शिवभोजन दिले जात आहे. १४ एप्रिल ते १५ जुलैपर्यंत मोफत शिवभोजन थाळीचा लाभ मिळणार आहे. संचारबंदीतही आधार ठरल्याने या योजनेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. राज्यस्तरावरून अनुदानाचा विलंब झाल्यास केंद्र चालकांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागते. मात्र, जिल्हास्तरावरून अनुदान प्राप्त होताच केंद्र चालकांना वितरित करण्यासाठी पाठपुरावा केला जाताे.

 केंद्रचालक म्हणतात....

शिवभोजन थाळीसाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आम्ही कोरोना नियमांच्या पालनात एका वेळी दहा जणांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. जिल्हा परिषद प्रांगणात आमचे केंद्र असल्याने येथे अनेक कामांसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. सर्व शासन नियमांनुसार पूर्ण व्यवस्था आहे. - रंजना खोब्रागडे, व्यवस्थापक, नवप्रभा साधन केंद्र, भंडारा

दुसऱ्यांदा लॉकडाऊन सुरू झाले होते. त्यावेळी केंद्रात अधिक ग्राहक येत होते. कधी कधी अनुदान मिळविण्यास थोडा उशीर लागला तरी आम्ही सर्वसामान्यांची गैरसोय होऊ देत नाही. आता अनुदान मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे वितरण सुलभ हाेते.शिवभाेजन केंद्र चालक, भंडारा

जिल्हा परिषद कँटीनच्या शिवभोजनाची चवच न्यारी... 

भंडारा शहरातील जिल्हा परिषद कँटीनमधील शिवभोजन थाळीची चवच न्यारी असल्याचे येथील आलेल्या ग्राहकांनी सांगितले. याशिवाय येथे कोरोना नियमांचे पालन व स्वच्छता राहत असल्याने माविंम संचलित केंद्रांतर्गत कार्यरत शिवभोजन केंद्राकडे अनेकांचा ओढा आहे. केंद्र चालकांना सरकारतर्फे अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. १४ एप्रिलपासून राज्य शासनाने मोफत शिवभोजन थाळी देण्यास सुरुवात केली आहे. १५ जुलैपर्यंत मोफत थाळी मिळणार आहे. 

 ग्रामीणला ३५ तर शहरात ४५  रुपये अनुदान - राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीत दोन चपात्या, एक भाजी, भात, आमटी असे पोटभर जेवण दिले जाते. सर्वसामान्यांना जरी मोफत अथवा पाच ते दहा रुपये मोजावे लागत असले तरी शासन केंद्र चालकांना ग्रामीण भागात ३५ रुपये तर शहरी भागात ४५ रुपयांचे अनुदान देत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उत्तम प्रतीचे जेवण मिळत असल्याने ही योजना सामान्यांना दिलासा देणारी ठरली आहे. ग्रामीण भागातून विविध कामांसाठी लवकर आलेल्या नागरिकांना शिवभोजन थाळीमुळे कमी पैशात चांगले जेवण  मिळत आहे. 

शिवभोजन केंद्रांचा इष्टांक शासनाने वाढविला असून, जिल्ह्यात सध्या ३८ शिवभोजन केंद्रे कार्यरत असून, त्या माध्यमातून अनेकांना लाभ दिला जात आहे. केंद्राचे अनुदान हे ऑनलाइन दिले जाते. राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त होताच केंद्रांना तत्काळ वितरित करण्यात येते. - अनिल बन्सोड,जिल्हा पुरवठा अधिकारी,भंडारा  

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय