शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

खेळामध्ये चमकणार त्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळणार; तुम्हीही करू शकता अर्ज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 11:44 IST

Bhandara : २०२३-२४ यावर्षाकरीता अर्ज आमंत्रित, क्रीडा विभागातर्फे दिला जाणार पुरस्कार

भंडारा : राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२३-२४ यावर्षीच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू, व्यक्ती यांच्याकडून २६ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारित नियमावली तयार केली आहे.

उल्लेखनिय कार्यासाठी होणार सन्मान ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडू आणि महिला क्रीडा मार्गदर्शक, असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंच्या सन्मानासाठी... क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षी, क्रीडा मार्गदर्शक यांचा सन्मान करण्याच्या अनुषंगाने शासनाच्या क्रीडा विभागातर्फे हा पुरस्कार देण्यात येत असतो.

अर्ज भरण्यासाठी नियम व अटी काय? तीन वर्षात खेळाडूने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी बजावलेली असावी. अर्जात तसा उल्लेख असणे अत्यंत आवश्यक आहे.

अर्ज भरण्याला सुरुवात १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

क्रीडा पुरस्काराचे स्वरूप काय? विजेत्यांना स्मृतिमानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच पन्नास हजार रुपये मानधन दिले जाते. शासकीय तथा निमशासकीय अधिकारी व कर्मचारी पात्र ठरल्यास पंचवीस हजार मानधन, एसटीचा परवाना दिला जातो.

अर्ज कसा भरणार? अर्ज http://sports.maharasht ra.gov.in या ऑनलाइन साईटवरील स्क्रोलिंग लिंकमध्ये जाऊन करता येतो.

"जिल्ह्यात या पुरस्कारांसाठी जनजागृती करण्यात येत आहे. पात्रताधारक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी क्रीडा विभागाच्या ऑनलाइन संकेतस्थळावरून २६ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा." - लतिका लेकुरवाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी, भंडारा.

टॅग्स :bhandara-acभंडारा