शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘त्या’ शिक्षक नेत्यांची झाली ‘घरवापसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:01 IST

मकरसंक्रांत हा भारतीय सणांमधील महत्वाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्देहेवेदावे ठेवले बाजूला : शेकडो शिक्षकांनी केला प्रवेश, एकदिलाने काम करण्याचे दिले अभिवचन

आॅनलाईन लोकमतभंडारा : मकरसंक्रांत हा भारतीय सणांमधील महत्वाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. वर्षभरात होणारे हेवेदावे किंवा वादविवाद बाजूला सारून या दिवसाच्या पर्वावर ‘तिळगुळ घ्या व गोड गोड बोला’ असे म्हणून वाद संपुष्टात आणण्याचा दिवस म्हणून ओळखल्या जातो. याची प्रचिती आज भंडारा शहरात आली. एकाच संघटनेत राहून फारकत घेतल्यानंतर बाहेर पडलेल्या शिक्षक नेत्यांना पुन्हा संघटनेत प्रवेश देऊन त्यांची घरवापसी झाली.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षक संस्थेवर वर्चस्व आहे. मात्र काही मतभेदामुळे मध्यंतरीच्या काळात या संघटनेत फुट पडली होती. संघटनेतून बाहेर पडलेल्या शिक्षक नेत्यांना पुन्हा संघटनेत सामावून घेत त्यांच्यासह अन्य काही संघटनांच्या शेकडो शिक्षकांनीही आज प्रवेशाचा सोपस्कार पार पाडला. भंडारा शहरातील श्री संताजी सभागृहात पार पडलेल्या एका कार्यक्रमात या शिक्षकांनी प्रवेश घेतला.जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या दोन संघटना अस्तित्वात आहेत. या संघटनांचे पत संस्थांवर वर्चस्व आहे. शिक्षक पत संस्थेत काही मतभेदांमुळे या दोन संघटनांच्या नेत्यांनी बंड पुकारून आपल्याच संघटनेविरूद्ध दुसरी चुल स्थापन करून प्रस्तापितांना हादरा दिला. शिक्षक पत संस्थेत सत्तारूढ गटातील संचालकांनी मे महिन्यात बंडाचा झेंडा हातात घेवून आपली सत्ता काबिज केली. त्यामुळे या संघटनेमध्ये अंतर्गत कलह उडाला होता.मात्र मागील काही दिवसांपासून या शिक्षक नेत्यांना घरवापसी करण्याच्या दृष्टीने खलबत्ते सुरू झाले होते. ज्या शिक्षकांच्या संघटनेतील पुनर्रप्रवेशाचा मार्ग आज शनिवारला मोकळा झाला.संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या शेकडो शिक्षकांनी आज संघटनेत प्रवेश घेतला. यामध्ये शिक्षक पत संस्थेचे उपाध्यक्ष रमेश काटेखाये व संचालक शंकर नखाते यांच्यासह मुकेश मेश्राम, कोमलसिंह चव्हाण, सुरेंद्र उके, प्रकाश अलोणे, रामेश्वर कांबळे, दिगांबर जिभकाटे, सुधीर माकडे, ए.आर. सावरबांधे, सुधाकर गोल्लर, संतोष कारेमोरे, वनवास धनिस्कर, मधुकर लेंडे, जीवनप्रकाश काटेखाये यांच्यासह आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील कैलास बुद्धे, शुद्धोधन बोरकर, बारई यांच्यासह सुमारे ६० ते ७० शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेत प्रवेश केला.तिळगुळ घ्या गोड गोड बोलामकरसंक्रातीच्या मुहूर्तावर झालेल्या या प्रवेशाने जुने वादविवाद सोडा, नवीन मार्गक्रमण करा यासाठी सर्वांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून संघटनेसाठी सहकार्य करण्याचे अभिवचन या माध्यमातून दिले. या प्रवेशादरम्यान पत संस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर, दिलीप बावनकर, अनिल गयगये यांच्यासह महिला शिक्षक नेत्यांमध्ये असलेला वाद या माध्यमातून मिटल्याचे सुतोवाच या प्रवेशादरम्यान जाहीर करण्यात आले.