शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

चोरट्या रेती साठ्याचा तुमसरात होणार लिलाव

By admin | Updated: November 17, 2015 00:36 IST

तुमसर तालुक्यातील वैनगंगा व बावनथडी नदी पात्रातून नियमबाह्य अवैध रेती उत्खनन करण्यात आली.

१,५२८ ब्रास रेती साठा : पांजरा व आष्टी रेती साठ्याचा समावेश, संबंधितांवर कारवाईची गरजमोहन भोयर  तुमसरतुमसर तालुक्यातील वैनगंगा व बावनथडी नदी पात्रातून नियमबाह्य अवैध रेती उत्खनन करण्यात आली. आष्टी व पांजरा (रेंगेपार) नदी काठावर सुमारे १५२८ ब्रास रेती डम्पींग करण्यात आली. त्या रेतीचा महसूल प्रशासन दि. १९ नोव्हेंबरला लिलाव करीत आहे. दीड हजार ब्रास रेती डम्पींग कुणी केली याचा सुगावा मात्र महसूल प्रशासनाला लागला नाही. येथे संबंधित रेती डम्पींग करणारे व तलाठी तथा मंडळ अधिकाऱ्यावर कारवाईची गरज आहे.भंडारा जिल्ह्यातील रेती घाटाची दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत होती. जिल्ह्यात एकूण २९ रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला होता. वैनगंगा व बावनथडी नदीपात्रातील रेती शहरात मोठी मागणी असून ती उच्च दर्जाची रेती आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी नदी घाटाच्या काठावर हजारो ब्रास रेतीचा साठा करून ठेवण्यात आला होता. काही साठा हा शासकीय जागेवर तर काही साठा खासगी शेतीत करण्यात आला. तुमसर तालुक्यातील पांजरा (रेेंगेपार) नदी काठावर वनविभागाच्या जमिनीवर (झुडपी जंगल) विना परवानगीने नियमबाह्यपणे पांजरा (मोहगाव खदान) गट क्रमांक १३२ मध्ये १०-२८ हेक्टर मधील ०.२३१ हेक्टर आर जागेवर ५२८ ब्रास रेती साठा (रोपवन जागेवर) करण्यात आला. सुमारे २३१० घनमिटर ही रेती आहे. महसूल प्रशासनाने रेती साठ्याची किंमत ७ लाख ९२ हजार इतकी आकारली आहे. याकरिता लिलावात सहभागी होणाऱ्याला १ लाख ९८ हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. आष्टी येथे बावनथडी नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन करून सुमारे ७०० ब्रास रेती नदी काठावरील खासगी शेतजमिनीत गटक्रमांक २१७५ मध्ये साठा करून ठेवला आहे. महसूल प्रशासनाने या रेतीसाठ्याची किंमत १० लाख आकारली आहे. येथे अनामत रक्कम सुमारे दोन लक्ष इतकी ठेवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी एका ब्रासची किंमत १५०० रुपये येथे निश्चित केली आहे. पांजरा (रेंगेपार) येथील वनविभागाच्या रोपवन तयार करण्यात येणाऱ्या जागेवर रेती साठा करून ठेवला. वनविभागाने तुमसर तहसीलदारांना या रेतीचा लिलाव करावा असे पत्र दिले.आष्टी येथील रेती साठा एका खासगी शेतीत करून ठेवण्यात आला. त्या शेतकऱ्याने तहसीलदारांना निवेदन देवून रेतीची तात्काळ विल्हेवाट लावण्याची मागणी केली. नदीपात्रातून रेती उत्खनन करून प्रचंड मोठा रेतीसाठा राजरोसपणे करण्यात आला. परंतु तो कुणी केला याची माहिती कुणालाच नाही. हे एक मोठे आश्चर्य आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.महसूल प्रशासनाचे गावातील तलाठी, मंडळ अधिकारी तथा गावातील ग्रामसेवक यांना याबाबत माहिती नाही असे समजते. तलाठ्यांच्या अहवालानुसार महसूल प्रशासन लिलाव करते. वनविभागही याबाबत अनभिज्ञ आहे हे विशेष. बाम्हणी रेती घाटावरील काठावर सुमारे ६५०० ब्रास रेतीचा साठा आहे.