शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कंटेन्मेट झोनमधील एटीएम फोडून चोरट्यांनी नऊ लाख पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पटवारी भवनच्या समोर इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समध्ये भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. शनिवारी सकाळी एटीएम फोडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलिसांना आणि स्टेट बँकेला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून रक्कम पळविल्याचे पुढे आले. विशेष म्हणजे सदर एटीएम कंटेनमेंट झोन मध्ये असून या परिसरात पोलिसांचा पहाराही असतो.

ठळक मुद्दे भंडारा शहरातील घटना। इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समधील एसबीआयचे एटीएम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील राष्ट्रीय महामार्गालगत कंटेनमेंट झोनमधील इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समध्ये असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी नऊ लाख ४० हजार रुपये पळविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडली. कंटेनमेंट झोनमध्ये चोरी झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. चोरट्यांच्या शोधासाठी शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले आहे.भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पटवारी भवनच्या समोर इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समध्ये भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. शनिवारी सकाळी एटीएम फोडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलिसांना आणि स्टेट बँकेला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून रक्कम पळविल्याचे पुढे आले. विशेष म्हणजे सदर एटीएम कंटेनमेंट झोन मध्ये असून या परिसरात पोलिसांचा पहाराही असतो. अशा स्थितीत अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील एटीएम फोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.एटीएम फोडणारे मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम मध्ये शिरले असावे असा कयास पोलिसांना आहे. लॉकडाऊनच्या काळात सदर चोरटे कोणत्या वाहनाने आले याचाही शोध पोलीस घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि भंडारा शहर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे या परिसरात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे चोरांचा शोध घेणे कठीण झाले आहे. तसेच एटीएम मधील कॅमेऱ्यातही पुरेसे फुटेज आल्याचे दिसत नाही. ही घटना केव्हा घडली याचाही थांगपत्ता लागला नाही.पोलिसांची दोन पथके तयारकंटेनमेंट झोनमध्ये चोरी झाल्याने पोलीस खळबळून जागे झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात दोन पथक तयार करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे आणि भंडाराचे ठाणेदार लोकेश कानसे या घटनेचा शोध घेत आहेत. वृत्त लिहिस्तोवर कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता.जिल्ह्यात एटीएम फोडणारी टोळी सक्रियभंडारा जिल्ह्यात अलिकडे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्याच्या घटना घडल्या आहेत. भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील बँक आॅफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही हाती लागले नव्हते. कोंढा, जवाहरनगर येथेही एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या. तुमसर शहरातही चोरट्यांनी एटीएम फोडले होते. मात्र अद्यापपर्यंत चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाही. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून पैसे पळविणारी ही टोळी आंतरराज्यीय असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. भंडारा शहरातील एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर दिसत आहे. बहुतांश एटीएम मध्ये चौकीदारही नसतो. तेथील कॅमेरेही अनेकदा बंद असतात. एखादी घटना घडल्यानंतरच त्याची चर्चा होते.

टॅग्स :Thiefचोरatmएटीएम