शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जीव मुठीत धरून 'त्यांनी' रात्री जागून काढल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 11:56 IST

भंडारात ६० इमारती जीर्ण : अतिवृष्टीने वाढली अनेकांची धडकी

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शहरात जीर्ण इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. नागरिक जीर्ण इमारतींतून स्वतःहून बाहेर निघत नाहीत तर दुसरीकडे प्रशासन कारवाईची नोटीस बजावून दिवस ढकलत आहे. पावसाळ्यात जीर्ण इमारती कोसळण्याच्या घटना जिल्ह्यात घडत असतात. सतर्कता न बाळगल्यास जीवित व वित्तहानी होते. पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा मुद्दा दरवर्षीच चर्चेत असतो; मात्र, त्यावर ठोस उपाययोजना भंडारा नगरपालिकेकडून होत नाही.

भंडारा शहरात ५० ते ६० वर्षे व त्यापेक्षाही जुन्या इमारती आजही बजरंग चौक, हेडगेवार चौक, मोठा बाजार मेन रोड परिसरात दिसून येत आहेत. या इमारतींमध्ये वास्तव्यासह दुकाने थाटली आहेत. मोडकळीस आलेल्या इमारतींचा वापर न करण्याबाबत प्रशासनाकडून बजावले जाते; परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. भंडारा शहरात जुन्या वस्तीत एका बाजूला एक अशा खेटून इमारती उभ्या आहेत. त्यामुळे एखाद्या जीर्ण इमारतीचा भाग कोसळल्यास आजूबाजूच्या रहिवाशांच्या जिवालादेखील धोका पोहोचण्याची भीती असते. पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासन अतिधोकादायक, धोकादायक इमारतींना नोटीस पाठवते. परंतु, या नोटिसांकडे दुर्लक्ष करून त्यात वास्तव्य केले जात असल्याचे चित्र भंडारा शहरात दिसून येत आहे.

शासकीय इमारती, निवासस्थाने जीर्ण शहरात शासकीय कार्यालयांच्या व वसाहतींच्या अनेक इमारती जीर्ण झालेल्या आहेत. काही इमारती सिमेंट व लोखंडी पत्र्याच्या आहेत. शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने शासकीय वसाहती व कार्यालयीन इमारती जैसे थे स्थितीत उभ्या आहेत.

शहरात धोकादायक ६० इमारती भंडारा शहरात जवळपास ६० इमारती जीर्ण असून, धोकादायक स्थितीत आहेत. या इमारत मालकांना स्थानिक प्रशासनाने नोटिसा बजावलेल्या आहेत. या इमारतीमध्ये बरीच कुटुंबे वास्तव्यास आहेत. तर काहींचे व्यवसाय सुरू आहेत. काही इमारतींत शिकवणी वर्ग तर काही इमारती कार्यालयीन कामासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे.

पालिकेने पाठविल्या ४० नोटीस शहरातील ४० जीर्ण इमारत मालकांना स्थानिक प्रशासनाने नोटीस बजावलेली आहे. ही नोटीस प्राप्त होऊनसुद्धा एकानेही घर सोडलेले नाही. दुसरीकडे राहण्याची व्यवस्था नाही. उत्पन्नाचे फारसे साधन नाही, त्यामुळे जावे तरी कुठे, असा प्रश्न अनेकांकडून प्रशासनास विचारला जात आहे.

अनेकांसमोर निवासाचा प्रश्न शहरातील जीर्ण इमारतींमध्ये जवळपास १५० नागरिक वास्तव्य करीत आहेत. अनेकांना राहण्यासाठी दुसरे घर नाही, प्रशासन निवारा देण्यास असमर्थ आहे. काहींची घरकुलाची मागणी आहे. काहींमध्ये मोठ्या प्रमाणात आपापसांत वादविवाद आहेत. त्यामुळे इथून जावे तरी कोठे, असा प्रश्न अनेकांसमोर आहे. इमारतीतून जागा सोडल्यास निवासाचा प्रश्न उभा राहू शकतो. 

टॅग्स :bhandara-acभंडारा