शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर कदापी अन्याय होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

तालुक्यातील जांभळी (सडक) येथे मार्तंडराव कापगते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषद अध्यक्ष नाना पटोले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देनाना पटोले : साकोली येथे मार्तंडराव कापगते स्मृती प्रतिष्ठानतर्फे सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कधी निसर्गाकडून तर कधी शासनाकडून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते. तरीही शेतकरी मोठ्या हिमतीने शेती करीत आहे. अशा शेतकऱ्यांना गरज आहे ती मार्गदर्शनाची. यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. त्यामुळेच आमच्या सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असून शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.तालुक्यातील जांभळी (सडक) येथे मार्तंडराव कापगते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषद अध्यक्ष नाना पटोले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी सभापती पद्माकर गहाणे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, दीपक मेंढे, यशोदा कापगते, जासवंत कापगते, डॉ.वामन डोंगरवार, चुन्नीलाल वासनिक आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात सिंचनावर भर देण्यात येणार आहे. यातून शेतीला पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात येईल. यावर्षी शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी मोठी अडचण निर्माण झाली. मात्र ती अडचण लवकरच दूर करून शेतकऱ्यांचा संपूर्ण धान खरेदी करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना शासनातर्फे जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी संकटाच्या वेळी धीर सोडू नये. हे सरकार शेतकरी हिताचे आहे. शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, आदर्श शेतकरी, आदर्श शिक्षक, आदर्श महिला व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मार्तंडराव कापगते यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव होमराज कापगते यांनी संचालन अर्चना बावणे व रुपेश कापगते यांनी तर आभार प्रा.सहसराम बन्सोड यांनी मानले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले