शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

३९७ वृक्षांची होणार कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

पुढील टप्पा मिटेवानी-चिचोली रस्त्यावरील ३९७ डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. याकरिता कंत्राटदाराने शासनाकडे २ लक्ष ९ हजार २३९ रुपयांचा भरणा केला आहे. सदर रस्त्यावर ६० ते ७५ वर्षे जुनी डेरेदार झाडे आहेत. वृक्षतोडीमुळे याचा पर्यावरणावर परिणाम होईल, यात शंका नाही.

ठळक मुद्देचिचोली-मिटेवानी रस्ता बांधकाम : संरक्षित वनातील झाडांना मात्र जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राज्यमार्ग रुंदीकरण देव्हाडी-तुमसर रस्त्यावरील डेरेदार ९६७ वृक्षांची कत्तल करण्यात आली. आता चिचोली-मिटेवानी दरम्यान तीन किमी अंतरातील ३९७ डेरेदार वृक्षांची कत्तल करण्याचा प्रस्ताव कंत्राटदाराने वनविभागाकडे सादर केला आहे. याकरिता कंत्राटदाराने शासनाकडे २ लाख ९ हजार २३९ रुपयांचा भरणा केला आहे. या झाडांचे मुल्यमापन नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून करण्यात आले आहे. चिचोली ते गोबरवाही दरम्यान सान किमी परिसरात संरक्षीत जंगलातील झाडे कापण्याची परवानगी नाही.गोबरवाही - देव्हाडी दरम्यान राज्य महामार्ग बांधकाम प्रस्तावित असून कामाला सुरुवात झाली आहे. प्रथम टप्प्यात तुमसर शहरातून जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे सुरु आहे. तुमसर- देव्हाडी ५ किमीच्या रस्त्यावरील ९६७ डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली.सदर पुढील टप्पा मिटेवानी-चिचोली रस्त्यावरील ३९७ डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. याकरिता कंत्राटदाराने शासनाकडे २ लक्ष ९ हजार २३९ रुपयांचा भरणा केला आहे. सदर रस्त्यावर ६० ते ७५ वर्षे जुनी डेरेदार झाडे आहेत. वृक्षतोडीमुळे याचा पर्यावरणावर परिणाम होईल, यात शंका नाही.पुर्नरोपण प्रक्रियाही अपूर्णरामटेक- तुमसर - गोंदिया हा राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधकाम सुरु आहे. दरम्यान रस्ता शेजारील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. येथेही पुर्नरोपण प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला नाही. रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या शेजारी दुप्पट वृक्षारापेण करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.चिचोली- मिटेवानीदरम्यान रस्ता शेजारील झाडांचे मुल्यमापन करण्यात आले आहे. २ लाख ६ हजार २३९ रुपये इतके मुल्यमापन करण्यात आले. झाडे कापण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही.- नितेश धनविजय,वनपरिक्षेत्र अधिकारी, नाकाडोंगरीवनविभागाने केले मूल्यमापननाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालयाने ३९७ डेरेदार वृक्षांचे मुल्यमापन करुन २ लाख नऊ हजार २३९ इतके मुल्य आकारले आहे. संबंधित कंत्राटदाराने शासनाकडे सदर रकमेचा भरणा केला आहे, परंतु वनविभागाने झाडे कापण्याची परवानगी दिली नाही अशी माहिती आहे.रस्ता बांधकाम येथे एकेरीच राहणारचिचोली ते गोबरवाही दरम्यान सातपुडा पर्वत रांगा असून सात किमी परिसर घनदाट जंगलाने वेढला आहे. हे संपूर्ण जंगल संरक्षित वनात आहे. येथून आंतरराज्यीय मार्ग जातो, परंतु रस्ता बांधकाम येथे एकेरीच राहणार आहे. त्यामुळे झाडे कापली जाणार नाही. उर्वरित रस्ता हा दुहेरी राहणार आहे.८० ते १०० वर्षे जुनी झाडेदेव्हाडी-तुमसर रस्त्यावरील ९६७ डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली. ही झाडे ८० ते १०० वर्षे जुनी होती. त्यामुळे काही झाडे पुर्नरोपन करुन ती वाचविता आली असती. काही झाडांना पुर्नरोपनच्या माध्यमातून जीवनदान मिळाले असते, परंतु इच्छाशक्त्ीचा अभाव येथे दिसून आले. वृक्षारोपणाच्या केवळ बाता करण्यात धन्यवाद मानणारा वनविभागाने येथे दखल घेतली नाही. रस्ता बांधकामाकरिता सर्रास झाडांचा बळी घेतला जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागpwdसार्वजनिक बांधकाम विभाग