शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

वाहनात हवा भरण्यासाठीही पैसे नाहीत, कर्जाचे हप्ते भरायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:39 IST

काहीतरी रोजगार असावा, या उद्देशाने काही बेरोजगार युवकांनी सुमो, स्कॉर्पिओ, झायलो, बोलेरो, टाटा मॅजिक, तसेच कार वर्गातील वाहने खरेदी ...

काहीतरी रोजगार असावा, या उद्देशाने काही बेरोजगार युवकांनी सुमो, स्कॉर्पिओ, झायलो, बोलेरो, टाटा मॅजिक, तसेच कार वर्गातील वाहने खरेदी करून व्यवसाय सुरू केला. बहुतांश जण चालक व मालक स्वत:च आहेत. ही सर्वच वाहने ८ ते १० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची आहेत. अनेक वाहनांसाठी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढण्यात आले आहे.

कोरोनामुळे मागील वर्षीही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. पुन्हा दुसऱ्या लाटेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे लांब प्रवासासाठी वाहन भाड्याने घेणे बंद झाले आहे. तसेच लग्न व इतर समारंभांमध्ये नागरिकांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. परिणामी ग्राहक मिळणे कठीण झाले आहे.

मागील वर्षभरापासून उत्पन्न ठप्प पडले असल्याने वाहनासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरावेत, असा प्रश्न या वाहन मालकांसमोर उपस्थित झाला आहे. शासनानेच आता कर्जावरील किमान व्याज तरी माफ करावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.

बॉक्स

वाहने सुरू, पण गॅरेज बंद

वाहन क्षमतेच्या निम्मे प्रवासी बसवून प्रवास करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. मात्र, गॅरेज व ऑटोमोबाइलची दुकाने बंद आहेत. एखाद्‌वेळी वाहनात बिघाड निर्माण झाल्यास दुरुस्ती करण्यास अडचण निर्माण होत आहे. सामानही मिळत नसल्याने थोडाफार जरी वाहनात बिघाड निर्माण झाल्यास ते घरीच ठेवावे लागत आहे. गॅरेज बंद असल्याने त्यांचाही रोजगार हिरावला गेला आहे.

अडचणींचा डोंगर

वाहन बंद राहिले तरी वाहनाची देखभाल व दुरुस्ती करावीच लागते. त्यामुळे वाहनाचा किमान खर्च सुरूच राहतो. हा खर्च न केल्यास वाहन बंद पडण्याची शक्यता राहते. कर्ज काढून वाहन खरेदी केले आहे. कर्जाचे हप्ते लाखोंच्या घरात आहेत. हे हप्तेकसे भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट

वाहने पॉइंटवर, मात्र ग्राहक मिळेना

दिवसातून एखादा ग्राहक मिळेल, या आशेने वाहने शहरातील कार पॉइंटवर लावली जात आहेत. मात्र, ग्राहकच मिळत नसल्याने आम्ही हतबल झालो आहोत. दुसऱ्या जिल्ह्यात सोडण्यासाठी ई-पास काढलेली एखादी व्यक्ती मिळते. लॉकडाऊनमुळे वाहनांचा व्यवसाय जवळपास ठप्पच पडला आहे.

सूर्यकांत गभणे, वाहन चालक-मालक

कर्ज काढून वाहन खरेदी केले. वर्षभरापासून या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे वाहनांच्या कर्जाचे हप्ते कसे भरावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीतील स्थिती लक्षात घेता कर्जावरील व्याज माफ करावे. तसेच कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत वाढवून देण्याची गरज आहे.

प्रकाश मेश्राम, वाहन चालक-मालक

गॅरेजवाल्यांचे पोट-पाणी बंद

गॅरेज बंद आहेत. दररोज येणाऱ्या उत्पन्नातून संसाराचा प्रपंच सुरू होता. मात्र, दुकानच बंद असल्याने रोजी-रोटी थांबली आहे. मागील महिनाभरापासून आम्ही कसे जीवन जगत आहोत, हे आम्हालाच माहीत.

विश्वा कोचे, गॅरेज मालक

वाहन हे अत्यावश्यक वस्तू झाली आहे. मंत्री, जिल्हाधिकारी व इतर सर्वसामान्य सर्वच नागरिक संचारबंदीतही वाहनाचा वापर करीत आहेत. वाहन बिघडल्यास त्यांचे कामकाजच ठप्प पडू शकते. गॅरेजचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून ते सुरू करू देण्याची परवानगी आवश्यक होती.

नरेंद्र मडावी, गॅरेज मालक