शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एकजुटीने संघर्ष करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 22:37 IST

आॅनलाईन लोकमतभंडारा : केंद्र व राज्य सरकारच्या कार्यकाळात अत्याचार वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी येणाऱ्या काळात दलित, अल्पसंख्यक, ओबीसी समाजाच्या उपेक्षित घटकांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकजूट होऊन संघर्ष करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता तथा काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी केले.काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने आयोजित केलेल्या समाजपरिवर्तन ...

ठळक मुद्देराजू वाघमारे यांचे प्रतिपादन : काँग्रेसचा समाजपरिवर्तन मेळावा

आॅनलाईन लोकमतभंडारा : केंद्र व राज्य सरकारच्या कार्यकाळात अत्याचार वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी येणाऱ्या काळात दलित, अल्पसंख्यक, ओबीसी समाजाच्या उपेक्षित घटकांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकजूट होऊन संघर्ष करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता तथा काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी केले.काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने आयोजित केलेल्या समाजपरिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदर अ‍ॅड.आनंदराव वंजारी होते. यावेळी अ.भा. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे महासचिव ख्रिस्टोपर तिलक, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबंधे, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल महासचिव जिया पटेल, प्रमोद तितिरमारे, प्रकाश पचारे, विकास राऊत, युवराज वासनिक, संजय मेश्राम उपस्थित होते. तत्पूर्वी शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात ख्रिस्टोपर तिलक म्हणाले, पक्षाला बळकट करण्यासाठी विचारधारा, नेतृत्व, संघटनकार्य या संकल्पना कार्यकर्त्यासमोर मांडल्या. तरूणांना पक्षासोबत जोडण्यावर भर दिला. जिल्हा प्रभारी डॉ.विनोद भोयर यांनी मार्गदर्शन केले. संचालन तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत यांनी तर आभारप्रदर्शन विनीत देशपांडे यांनी केले.कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजकुमार मेश्राम, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, नितिन बागडे, अ‍ॅड.शशिर वंजारी, लोकचंद बेलकर, अवेश पटेल, शमीम पठान , अयाज पटेल, डॉ.लांडगे, वंदना लोने, सिमा भुरे, गणेश लिमजे, किशोर राऊत, पृथ्वी तांडेकर, डॉ.दिलीप मेश्राम, अमर रगडे, कैलाश बाहे, शमीमा पठान, शिव बोरकर अनवर खान, प्रिया खंडारे, जाबिर मालाधारी, सुभाष गजभिये स्वप्निल भालाधरे व कार्यकर्ते उपस्थित होते.