शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात काळे, पाखर धान खरेदी करण्याची योजनाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2022 20:53 IST

संकटाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र उघडून पाखर धानाला बोनससह खरेदी करणे आवश्यक आहे. मात्र सध्या तरी हा धान खरेदी करण्याचे कोणतेही नियोजन पणन विभागाकडे नाही. सरकारने त्वरित निर्णय घेऊन १९९७-९८च्या धर्तीवर काळा धान खरेदीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी आमदार राजू कारेमोरे यांनी केली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगाम २०२२-२३  मध्ये आधारभूत किमतीवर धान खरेदी करण्याच्या योजनेंतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पणन विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे, मात्र धानाची थेट खरेदी झालेली नाही. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दि. १० नोव्हेंबरनंतरच धान खरेदी केंद्रे सुरू होणार असल्याची माहिती आहे, मात्र, कापणीनंतर पावसाने काळवंडलेल्या धानाची खरेदी केली जाणार नाही. शेतात भिजून काळे झालेले व पाखर धान खरेदीसाठी पणन विभागाचे कोणतेही नियोजन नाही. यापूर्वी १९९७-९८ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतात ठेवलेले भात काळे पडले होते. शेतकऱ्यांची मागणी आणि राजकीय दबावामुळे शासनाने अधिसूचना काढून काळा पाखर धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सर्व शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीवर काळा पाखर धान खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यावेळीही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील शेतात ठेवलेले धान भिजून काळवंडले असून, हा काळवंडलेला धान खरेदी होणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. 

प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र उघडा - संकटाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र उघडून पाखर धानाला बोनससह खरेदी करणे आवश्यक आहे. मात्र सध्या तरी हा धान खरेदी करण्याचे कोणतेही नियोजन पणन विभागाकडे नाही. सरकारने त्वरित निर्णय घेऊन १९९७-९८च्या धर्तीवर काळा धान खरेदीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी आमदार राजू कारेमोरे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती