शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तेलही नाही अन् सिलिंडरही मिळतोय तोही रिकामा. .!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 05:00 IST

किचन शेडमध्ये तेलाचं भांडच नाही तर धान्य कसे शिजवावे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. त्यामुळे तेल खरेदीचा  आर्थिक भार मुख्याध्यापकांवर पडणार असल्यामुळे विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहार देणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यासाठी पुरवठा विभागाकडून धान्यसाठा शाळांना वितरित करण्यात आला आहे. मात्र,  तेल वगळण्यात आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शालेय पोषण आहाराच्या धान्यासोबत तेल दिले गेले नाही तसेच सिलिंडरचा गॅस हंडा रिकामा मिळू लागला आहे. आता तेल नाही अन् सिलिंडरही रिकामा, त्यामुळे शालेय पोषण आहार शिजवायचा कसा, अशा प्रश्न मुख्याध्यापकांपुढे निर्माण झाला आहे. तेलाचा पुरवठा तातडीने करण्यात यावा,  अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने करण्यात आली आहे. राज्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या धान्यादी मालामध्ये आतापर्यंत तेलाचा पुरवठा करण्यात येत होता; परंतु यंदा तेलाचे धान्यादी मालासोबत  पॉकेट वितरित करण्यात आले नाही. म्हणजे, किचन शेडमध्ये तेलाचं भांडच नाही तर धान्य कसे शिजवावे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. त्यामुळे तेल खरेदीचा  आर्थिक भार मुख्याध्यापकांवर पडणार असल्यामुळे विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहार देणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यासाठी पुरवठा विभागाकडून धान्यसाठा शाळांना वितरित करण्यात आला आहे. मात्र,  तेल वगळण्यात आले आहे. शाळा स्तरावरच तेल खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.आजघडीला गोडेतेलाचे भाव एका किलोमागे १६० ते १८० रुपये आहे. तेलाचा भाव वाढतच जात आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांना स्वखर्चातून  तेल खरेदी करावे लागणार आहे.  मुख्याध्यापकांना आर्थिक व मानसिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. असे असताना शालेय पोषण आहार शिजवावाच लागेल.  प्रशासनाकडून आलेली सूचना पाळावीच लागणार आहे. नाही पाळली तर कारवाईस पात्र, असा अप्रत्यक्ष दम प्रशासनाकडून दिला जात आहे तसेच आता किचनशेडमधून धूर येणे बंद होणार आहे. चुलीच्या जागी गॅस सिलिंडर येणार आहे. शासनाकडून गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी ४ हजार  ९० रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील काही शाळांनी गॅस सिलिंडर खरेदी केला. पण, तो सिलिंडर रिकामा दिला गेला आहे. गॅस सिलिंडर भरायला वेगळे रुपये लागतील असे सांगितले जात आहे. आता एक गॅस  सिलिंडर रिफिल भरण्यासाठी मुख्याध्यापकांना एक हजार रुपयाच्यावर आपले खिसे खाली करावे लागणार आहेत.

असंतोष कायम- शासनाकडून '' तेलही नाही अन् धान्य शिजविण्यासाठी सिलेंडर खाली '' अशी अवस्था झाली आहे. या प्रकारामुळे मुख्याध्यापकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शासन व प्रशासनाने शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गोडे तेलाचा तात्काळ पुरवठा करावा. तसेच एका शाळेला गॅस शेगडी व भरलेले दोन सिलेंडर पुरविण्यात यावे. तसेच विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात गॅस सिलेंडर पुरवठा करण्यात यावा अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजू बालपांडे, सचिव राजू बांते, उपाध्यक्ष रेखा भेंडारकर, प्रमोद धार्मिक, अर्चना बावणे, विष्णुदास जगनाडे, राधेश्याम धोटे, सुनीता तोडकर, कुंदा गोडबोले, वीपीन रायपूरकर, राजू भोयर, सुनील घोल्लर, गोपाल बुरडे आदी पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांना निवेदनातून केली आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र