भंडारा तालुक्यातील परसोडी साजा क्रमांक दोनमध्ये जवाहरनगर परसोडी दरम्यान परसोडी हद्दीतील गट क्रमांक २७९ मधील क्षेत्रफळ १११९. ९८ मी/ २ व मालमत्ता क्रमांक ९१ ला शालू कावळे यांचे नावे २६०.२२ मी/२ (२२००फु/२) क्षेत्रफळ नोंद नमुना आठ लाख केली आहे. ग्रामपंचायत परसोडीच्या नमुना ८ ला केलेली गट क्रमांक २७९ची नोंद ज्याची भूधारण झुडपी जंगल गवत भोगवटादार सरकार या वर्णनाची जमिनीची नोंद नियमबाह्य केली आहे. अशा जमिनीवर अकृषक कर लावावयाचे असताना सरकारी जागेवर भोगवटादार नोंदवून नियमबाह्य कर आकारणी केली. असे चौकशी अहवालात नमूद केले आहे. चौकशीत ग्रामविकास अधिकारी के. डबलू. नागपुरे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायत परसोडीची कार्यकारिणी १७ एप्रिल २०१६ पासून कार्यरत आहे. ही बाब आल्यानंतर तहसीलदार भंडारा यांच्याकडे ८ जून २०२० च्या पत्रानुसार १२ जून २०२० अतिक्रमण काढण्यात आले. ग्रामपंचायत परसोडीचा ठराव क्रमांक ९/१५ २७ मे २०२० नुसार नमुना ८ वरील नोंदी रद्द करण्यात आल्या. ग्रामपंचायत सदस्य ओम कवण थापा यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे ३ जून २०२१ ला तक्रार दाखल केली असून त्या सचिवाला सेवेतून कमी करून तत्कालीन सरपंचावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
परसोडी ग्रामपंचायतचे तत्कालीन सचिव चौकशीत दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST