शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

महसूल प्रशासनाने जप्त केलेल्या ४०० ब्रास रेतीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

पांजरा गावाजवळून वैनगंगा नदी वाहाते. येथील नदीपात्रात उच्च दर्जाची व गुणवत्ता प्राप्त रेतीचा मुबलक साठा आहे. रेती तस्करांनी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करून नदीकाठावर साठा करून ठेवले होता. याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर मसूर महसूल प्रशासनाने चारशे ब्रास रेतीसाठा जप्त केला होता. रेतीच्या देखरेखीकरिता  पोलीसपाटील व तलाठी यांची नियुक्ती केली होती. परंतु त्यानंतरही येथील रेती चोरीला गेली.

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील पांजरा रेती घाटावरील ४०० ब्रास रेती साठा महसूल प्रशासनाने जप्त केला होता. हा रेतीसाठा चोरीला गेला. याबाबत तहसीलदारांनी सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. परंतु दीड महिन्यानंतरही रेती चोरीचा अद्याप सुगावा लागला नाही. त्यामुळे पाणी कुठेतरी मुरत असल्याचे दिसून येते.पांजरा गावाजवळून वैनगंगा नदी वाहाते. येथील नदीपात्रात उच्च दर्जाची व गुणवत्ता प्राप्त रेतीचा मुबलक साठा आहे. रेती तस्करांनी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करून नदीकाठावर साठा करून ठेवले होता. याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर मसूर महसूल प्रशासनाने चारशे ब्रास रेतीसाठा जप्त केला होता. रेतीच्या देखरेखीकरिता  पोलीसपाटील व तलाठी यांची नियुक्ती केली होती. परंतु त्यानंतरही येथील रेती चोरीला गेली.याची दखल घेत तहसीलदार बाळासाहेब तेळे यांनी सिहोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली. या घटनाक्रमाला दीड महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला तरी अद्याप रेती चोरीचा सुगावा लागला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीपात्रातून रेती उत्खनन करणे, महसूल प्रशासनाने जप्त केलेली रेती चोरीला जाणे, हा सगळा प्रकार संशयास्पद वाटतो.दुसरीकडे घरकुल लाभार्थ्यांना नदीपात्रातून रेती घेऊन जाण्यास मनाई करण्यात येते, तर दुसरीकडे रेतीची सर्रास चोरी होते, हा सगळा प्रकार संशयास्पद वाटतो. ४०० ब्रास रेती चोरीला गेल्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे महसूल विभागाचेही आर्थिक नुकसान झाले. या प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.            

पांजरा रेती घाटातून रेती चोरी झाली. त्यासंदर्भात सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.-बाळासाहेब तेळे,तहसीलदार, तुमसर.

 

टॅग्स :sandवाळू