शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचा बनाव अन् तरुण सापडला जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. अनिल काही न सांगता ३ मार्च रोजी दुचाकीने घरून निघून गेला. इकडे इंजेवाडातही आला नाही. पती घरी न आल्याने काळजीत पडलेल्या पत्नीने ४ मार्च रोजी नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. नातेवाईक अनिलचा शोध घेत होते. दरम्यान, बुधवारी सकाळी देव्हाडा साखर कारखाना परिसरातील तलावाच्या पाळीवर दुचाकी (क्र. एमएच ३६ एएच ०८०१) काही व्यक्तींना दिसली. पाण्यात बूट व मोेजे तरंगताना दिसत होते.

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) :  प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाचा पत्नीसोबत वाद झाला. दुचाकीने घरून निघून गेला. पती बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नीने पोलिसांत दिली. अशातच तलावाजवळ एक दुचाकी आणि पाण्यात बूट व मोजे दिसले. तरुणाचे वडीलही पोलीस ठाण्यात पोहचले. काही वेळातच करडी पोलीस घटनास्थळी पोहचले. शोधाशोध सुरू झाली. एका झुडपात लपून बसलेल्या तरुणाने पोलीस पाहताच पळ काढला. अखेर चार किमी पाठलाग करून जेरबंद केले. हा थरार मोहाडी तालुक्यातील देव्हाडी साखर कारखाना परिसरात बुधवारी सकाळी अनेकांनी अनुभवला. मुलगा जिवंत असल्याचे पाहून पालकाच्या जीवात जीव आला. अनिल कुसन हातझाडे (२६) रा. इंजेवाडा, ता. भंडारा असे त्या तरुणाचे नाव आहे.  तो सध्या नागपूरच्या सीतानगरात कामानिमित्त वास्तव्याला आहे. अनिलचा पल्लवी नामक तरुणीशी महिनाभरापूर्वी प्रेमविवाह झाला. क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. अनिल काही न सांगता ३ मार्च रोजी दुचाकीने घरून निघून गेला. इकडे इंजेवाडातही आला नाही. पती घरी न आल्याने काळजीत पडलेल्या पत्नीने ४ मार्च रोजी नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. नातेवाईक अनिलचा शोध घेत होते. दरम्यान, बुधवारी सकाळी देव्हाडा साखर कारखाना परिसरातील तलावाच्या पाळीवर दुचाकी (क्र. एमएच ३६ एएच ०८०१) काही व्यक्तींना दिसली. पाण्यात बूट व मोेजे तरंगताना दिसत होते. आत्महत्या झाल्याच्या चर्चेला परिसरात उधाण आले. अशातच सकाळी अनिलचे वडील करडी ठाण्यात पोहचले. ठाणेदार राजेंद्र गायकवाड यांना माहिती दिली. त्यानंतर देव्हाडा बिटचे हवालदार लंकेश राघोर्ते व अर्पित भोयर यांनी शोध सुरू केला. तलावात शोध घेतला. पण थांगपत्ता लागत नव्हता. त्याचवेळी झुडपात लपलेला एक तरुण पोलिसांना पाहताच पळू लागला. अखेर चार किमी पाठलाग करून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी अनिलला वडिलांच्या स्वाधीन केले. त्याला उपचारासाठी तुमसरच्या रुग्णालयात नेण्यात आले.

तलावावर बघ्यांची झाली गर्दी - कुणीतरी आत्महत्या केल्याची वार्ता परिसरात पसरताच तलावावर बघ्यांची मोठी गर्दी झाली. नागरिकांच्या मदतीने संपूर्ण तलाव शोधून काढण्यात आला. मात्र थांगपत्ता लागत नव्हता. काय झाले, कुठला तरुण आहे, याची चौकशी नागरिक करू लागले. अखेर तरुण जिवंत सापडल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र दिवसभर याच घटनेची परिसरात चर्चा होती.

 

टॅग्स :Policeपोलिस