शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वारा आला अन् वीज गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने लहानसहान बाबीवरुनही वीजपुरवठा खंडित होत आहे. १५ दिवसांपूर्वी तर पूर्णत: ब्लॅक आऊट झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. शनिवारी रात्री ९ ते ११ च्या सुमारास विजेचा खेळखंडोबा बघायला मिळाला. ग्रामीण भागात तर वीज केव्हा येणार याची शाश्वती राहिली नाही. तर दुसरीकडे कृषीपंपांचा वीजपुरवठा नियमित न होणे ही समस्याही कायम आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वीज ही मूलभूत घटकांपैकी एक अनन्यसाधारण घटक आहे; परंतु देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने लहान-सहान कारणावरूनही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. वारा आला अन् वीज गेली असाच प्रकार गत दोन दिवसांपासून सुरू आहे. रात्री-बेरात्री विजेचा पुरवठा खंडित होत असल्याने आबालवृद्धांची प्रचंड गैरसोय होत आहे. जिल्ह्यात ५ लाखांपेक्षा जास्त वीज ग्राहक आहेत. यात घरगुती, व्यापारी कामासाठी, औद्योगिक, सार्वजनिक दिवाबत्ती, कृषी व इतर विद्युत ग्राहक मिळून विजेची मोठी खप होत आहे. गतवर्षी विजेचा दरडोई वापर ३६० किलोवॅट प्रती तासापेक्षा जास्त होता. यावर्षी यात चांगलीच वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत असताना विजेची मागणीही वाढली आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊसही बरसला आहे. गत आठवड्यात साकोली तालुक्यातील एकोडी परिसरात वादळी वाऱ्याने थैमान घातले होते. याची पुनरावृत्ती गत दोन दिवसात पुन्हा बघायला मिळत आहे; परंतु या लहानसहान बाबींमुळे विजेचा पुरवठा खंडित होत असल्याचे दिसून येते. महावितरणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक कर्मचाऱ्यांवर कमी झाल्याने ही समस्या उद्भवल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने लहानसहान बाबीवरुनही वीजपुरवठा खंडित होत आहे. १५ दिवसांपूर्वी तर पूर्णत: ब्लॅक आऊट झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. शनिवारी रात्री ९ ते ११ च्या सुमारास विजेचा खेळखंडोबा बघायला मिळाला. ग्रामीण भागात तर वीज केव्हा येणार याची शाश्वती राहिली नाही. तर दुसरीकडे कृषीपंपांचा वीजपुरवठा नियमित न होणे ही समस्याही कायम आहे. जिल्ह्यात २ लाखांपेक्षा जास्त घरगुती वीज जोडणी आहे. तर १९ हजार पेक्षा जास्त व्यापारी कामासाठी वीज जोडणी देण्यात आली आहे. ३६ हजार ५०० च्या वर औद्योगिक जोडणी देण्यात आली असून २ लाखांपेक्षा जास्त कृषीपंपधारक आहेत. विजेची मागणी अधिक असून त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने अवेळी होणारे भारनियमन वेगळेच आहे.

‘लो व्होल्टेज’ची समस्या कायम- वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर कुठे कोणता बिघाड झाला असेल याची माहिती कंपनीला असते. मात्र विद्युत गेल्यावर व लगेच वीज आली तरी लो व्होल्टेजचा सामना करावा लागत असतो. यात विद्युत उपकरणे निकामी होण्याची समस्याही बळावली आहे. शनिवारी याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. अनेक वाॅर्डात एक फेस नसल्याने त्याचा परिणाम अन्य बाबींवर जाणवला. लो व्होल्टेजमुळे नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून आले.

ग्राहक विद्युत मीटरच्या प्रतीक्षेत- वीज कंपनीत विद्युत  मीटरचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर रस्त्यावर अतिक्रमणधारकांना विद्युत मीटर कसे काय दिले जाते असाही प्रश्न उपस्थित होतो. नियमात त्यांनाही मीटर देणे योग्य बाब असली तरी अन्य ग्राहक मात्र प्रतीक्षेत आहेत.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज