शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराहून गावाकडे परतणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: January 13, 2024 17:19 IST

नागपुरातून उपचार घेऊन ही महिला परतीच्या प्रवासात भंडारा बसस्टॉपवरून जाण्यासाठी साकोली आगाराची बस क्रमांक एम. एच.४० वाय.५३९६ मध्ये साकोलीला जाण्यासाठी मुलासह निघाली होती.

भंडारा : नागपूरच्या रुग्णालयात कॅन्सरच्या उपचारासाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रक्कम असा ६५ हजार रुपयांचा ऐवज प्रवासादरम्यान चोरीस गेल्याचा प्रकार घडला. आधीच आजारपणामुळे दु:खात असलेल्या या महिलेवर या चोरीच्या प्रसंगामुळे मोठे संकटच कोसळले आहे.ही घटना लाखनी बसस्थानकावर शिनवारी घडली. रेखा तेजराम झोडे (५७, बोदरा (देऊळगाव) ता.अर्जुनी/मोर) असे या महिलेचे नाव असून ती आपला मुलगा मिथुन याच्यासह भंडारा बसस्थानकावरून साकोलीकडे जाण्यास निघाली होती. या प्रवासादरम्यान हा प्रकार तिच्या लक्षात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातून उपचार घेऊन ही महिला परतीच्या प्रवासात भंडारा बसस्टॉपवरून जाण्यासाठी साकोली आगाराची बस क्रमांक एम. एच.४० वाय.५३९६ मध्ये साकोलीला जाण्यासाठी मुलासह निघाली होती. दरम्यान तिकीट काढण्यासाठी तिने आपली पर्स पाहिली असता चेन उघडी दिसली. पर्स पाहिली असता पर्समधील १० ग्रॅमचे सोन्याचे मनी, ३ ग्रॅम लॉकेट व एक हजार रुपये असा एकूण रोख रकमेसह ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी प्रवाशांची तपासणी केल्यावर कुणाकडेही चोरीचा ऐवज आढळला नाही. यावरून बसमध्ये चोरी झाली नसून भंडारा बसस्थानक किंवा बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरी झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. लाखनी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बस पोचली थेट पोलीस ठाण्यात

आपल्या दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात येताच महिलेने रडारड सुरू केली. यामुळे बसचालक आशिष धुर्वे व वाहक सहादेव केवट यांनी बस थेट लाखनी पोलीस ठाण्यात नेली. पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांना घटनेची माहिती दिल्यावर महिला पोलीस कर्मचारी योगिता सिंगनजुडे, मनीषा खेडीकर, प्रगती वैद्य, सुनील शरजारे यांनी बसमधील प्रवाशांची अंगझडती व सामानाची तपासणी केली. मात्र चोरी गेलेला मुद्देमाल मिळाला नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी