शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

घाट बंद झाल्याने रेतीचे भाव गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

मोहाडी तालुक्यातील मुंढरी, रोहा, कुरोडा, बेटाळा, मोहगाव देवी, खमारी, नेरी व पांचगाव रेतीघाटावरून रेती काढणे सध्या बंद असल्याने रेतीचे भाव अव्वाच्या सव्वा झाले आहेत. मोहाडीच्या तहसीलदारांनी रोहा घाटावर दिवस, रात्र खडा पहारा सुरू केल्याने नेहमी ट्रॅक्टरने गजबजलेल्या या रेतीघाटावर शुकशुकाट आहे. रेती चोरी बंद झाल्याने रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले असून सततच्या कारवाईला त्रासून व कर्जाचे हप्ते थकीत झाल्याने अनेकांनी आपले वाहन विक्रीसाठी काढले आहेत.

सिराज शेखलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातील काही रेतीघाटावर येथील तहसीलदार दीपक कारंडे यांनी महसूल कर्मचाऱ्यांचा खडा पहारा लावल्याने दररोज होणारी शेकडो ब्रास रेतीची चोरी थांबली आहे. मात्र रोहा घाटाला लागूनच असलेल्या तुमसर तालुक्यातील सुकळी रेती घाटात मात्र रेती चोरी सुरूच आहे. तेथील रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. मोहाडी तालुक्यातील मुंढरी, रोहा, कुरोडा, बेटाळा, मोहगाव देवी, खमारी, नेरी व पांचगाव रेतीघाटावरून रेती काढणे सध्या बंद असल्याने रेतीचे भाव अव्वाच्या सव्वा झाले आहेत. मोहाडीच्या तहसीलदारांनी रोहा घाटावर दिवस, रात्र खडा पहारा सुरू केल्याने नेहमी ट्रॅक्टरने गजबजलेल्या या रेतीघाटावर शुकशुकाट आहे. रेती चोरी बंद झाल्याने रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले असून सततच्या कारवाईला त्रासून व कर्जाचे हप्ते थकीत झाल्याने अनेकांनी आपले वाहन विक्रीसाठी काढले आहेत. परंतु लागूनच असलेल्या तुमसर तालुक्यातील सुकळी रेती घाटाला मात्र इतर घाट बंद असल्याने सुगीचे दिवस आले आहे. सुकळी रेती घाटावरून पांजरा, खरबी- डोंगरगाव मार्गे आंधळगाव क्षेत्रात सर्रास ट्रॅक्टरने रेती वाहतूक सुरू आहे. रेती घाट बंद झाल्याने मोहाडी शहर व परिसरातील रस्ते व घर बांधकामावर मोठे संकट उद्भवले आहे. रेती मिळत नसल्याने व रेतीचे भाव तीन हजार प्रती ट्रॅक्टर झाल्याने अनेकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने दिलेल्या गरीब लोकांच्या घरकुलाचे कामही रेतीअभावी बंद पडले आहे. 

तहसीलदारांवर पाळत- मोहाडीचे तहसीलदार कारंडे यांचा रेतीमाफियांनी एवढा धसका घेतला आहे की ते कुठे आहेत, काय करीत आहेत हे पाहण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात तीन - चार व्यक्ती त्यांच्यावर पाळत ठेवायचे. ते कार्यालयाबाहेर निघताच तिकडे रेती घाटावर सूचना पोहचत असे. त्यांच्या वाहनांच्या मागे दुचाकीने किंवा चारचाकी वाहनाने हद्दीबाहेर जात पर्यंत त्यांचा पाठलाग व्हायचा. त्यांचे वाहन मोहाडीकडून कोणत्याही रेती घाटाकडे वळताच सर्वच रेती घाटातील जेसीबी, ट्रॅक्टर क्षणार्धात गायब व्हायचे. त्यामुळे तहसीलदारांना अनेकवेळा पक्की खबर मिळूनही रिकाम्या हाती परत यावे लागत होते. त्यामुळे दोन तीन वेळा तर त्यांनी खासगी वाहनाने गुप्तपणे जाऊन जेसीबी, टिप्परवर कारवाई केलीच. आता तर सरळ रेती घाटावरच पहारा सुरू केला आहे.

दाभा चौकी नावापुरतीच- अवैध रेतीवर आळा घालण्यासाठी दाभा मोडीवर पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे. मात्र ही चौकी नावापुरतीच आहे की काय अशी शंका येते.  कारण पूर्वी सुकळी, बेटाळा, कुरोडा येथून विनारायल्टीची भरलेली रेतीचे टिप्पर या चौकीसमोरून पहाटेला व सायंकाळी बिनदिक्कतपणे पसार व्हायचे. त्यामुळे या चौकीवर बंदोबस्तावर असलेले पोलीस डोळे बंद करून राहत होते की चिरीमिरी देऊन टिप्पर सोडले जात होते, अशी चर्चा जनमानसात सुरू राहणे स्वाभाविकच आहे. 

 

टॅग्स :sandवाळू